Raver Loksabha Election : अजितदादा गटाचा रावेर लोकसभेसाठी प्रयत्न : जिल्हाध्यक्ष संजय पवार

Raver Loksabha Election : अजितदादा गटाचा रावेर लोकसभेसाठी प्रयत्न : जिल्हाध्यक्ष संजय पवार
esakal
Updated on

Loksabha Election : राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्ह्यात बळकटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी आम्ही तालुकानिहाय बैठका घेत आहोत. रावेर लोकसभा मतदारसंघ लढण्यासाठी आमची तयारी सुरू आहे. या मतदारसंघात आमचा उमेदवार देण्याचे प्रयत्न सरू आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत रावेर मतदारसंघातील शरद पवार गटाचा एक व काँग्रेस पक्षाचा एक, असे दोन मोठे नेते आमच्या पक्षात सामील होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला. (District President Sanjay Pawar statement Ajit pawar group attempt for Raver Lok Sabha jalgaon news )

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पक्षबांधणीसाठी पक्षाच्या तालुकानिहाय बैठका सुरू आहेत. जामनेर व चोपडा येथे पक्षाची बैठक घेण्यात आली. इतर तालुक्यांतही बैठका घेण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, की राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) व आमची महायुती आहे.

त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल. जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन व अनिल भाईदास पाटील संयुक्तपणे जो निर्णय घेतील तो मान्य असेल. आमच्या पक्षातर्फे आगामी काळात जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका व महापालिकांच्या निवडणूका लढण्यात येतील.

रावेर लोकसभेसाठी तयारी

रावेर लोकसभा मतदारसंघ लढण्यासाठी आम्ही तयारी करीत आहोत. हा मतदारसंघ आमच्याकडे घेण्यासाठी आमचे नेते अजित पवार बोलतील त्या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येण्याचे आमचे विजयाचे गणित आम्ही वरिष्ठ स्तरावरून देणार आहोत. सद्या हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे.

Raver Loksabha Election : अजितदादा गटाचा रावेर लोकसभेसाठी प्रयत्न : जिल्हाध्यक्ष संजय पवार
Loksabha Election : भाजप-धजद युतीबाबत कोणीही उघड वक्तव्य करू नका; दिल्लीतून हायकमांडचा नेत्यांना स्पष्ट इशारा

त्या ठिकाणी पक्षाचा विद्यमान खासदारही आहे; परंतु दोन वेळा भाजपने या मतदारसंघात विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारून दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. त्यामुळे ‘महायुती’त आम्ही या मतदारसंघावर दावा करणार आहोत. याबाबत वरिष्ठ स्तरावर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा

पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची तारीख लवकरच निश्चित होणार आहे. त्या अगोदर जिल्ह्यातीतील पंधरा तालुक्यांत पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल.

दोन मोठे नेते पक्षात येणार

जळगाव जिल्ह्यात रावेर लोकसभा मतदारसंघातील दोन मोठे नेते आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नेता असेल, तर दुसरा काँग्रेस पक्षातील असणार आहे. अजित पवारांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यात हे नेते पक्षात प्रवेश करतील, असा दावाही संजय पवार यांनी केला.

Raver Loksabha Election : अजितदादा गटाचा रावेर लोकसभेसाठी प्रयत्न : जिल्हाध्यक्ष संजय पवार
Anandacha Shidha : ‘आनंदाचा शिधा’त मिळणार पोहे अन् मैदा; दिवाळीचा गोडवा आणखी वाढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.