Jalgaon : दिवाळीत साफसफाईचे ‘तीन तेरा’; नगरसेवकांनी तक्रार करूनही ‘वॉटरग्रेस’ सुधरेना

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

जळगाव : ‘दिवाळीत साफसफाई होत असल्यामुळे कचरा वाढला’ असे सांगणाऱ्या वॉटरगेस कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसत आहे. नगरसेवकांनी महासभेत तसेच आमदार भोळे यांच्या बैठकीत तक्रारी करूनही ‘वॉटरग्रेस’च्या कामात सुधारणा दिसत नसल्याचे चित्र आहे.

‘वॉटरग्रेस’ कंपनीकडे कचरा गोळा करण्यासोबतच काही भागांत साफसफाई करण्याचाही मक्ता आहे. मात्र कचरा गोळा करण्यासाठी गाड्या न येण्याच्या तक्रारी आहेतच. परंतु अनेक ठिकाणी आता कर्मचाऱ्यांतर्फे साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी आहेत. ‘वॉटरग्रेस’चा मक्ता ज्या भागात आहे, तेथे सकाळी साफसफाई होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

‘वॉटरग्रेस’चे कर्मचारी कामच करीत नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावरच कचरा दिसत आहे. दिवाळीत साऱफसफाई करण्याची गरज आहे, परंतु वॉटरग्रेस कंपनीचा उलटा कारभार आहे. अनेक ठिकाणी साफसफाईच केलेली नाही. याबाबत नागरिक तसेच नगरसेवकांतर्फे तक्रारी करण्यात आल्या आहेत.(Disturbance in Diwali Cleaning Despite complaints by corporators Water Grace did not improve Jalgaon News)

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon: गुदाम व्यवस्थापकाकडून पुरवठा निरीक्षकाला मारहाणीचा प्रयत्न

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

वॉटरग्रेस कंपनीच्या कारभाराकडे महापालिकेच्य आरोग्य विभागाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वॉटरग्रेसचे किती कर्मचारी हजर आहेत. याची रोज मोजणी करण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांवर आहे. मात्र तेच दुर्लक्ष करीत आहेत. कर्मचारी कमी असतानाही त्याबाबत आरोग्य निरीक्षक नोंद करीत नसल्याचीही नगरसेवकांकडून तक्रार होत आहे.

...तर अधिकाऱ्यावर कारवाई

सफाई मक्तेदार वॉटरग्रेस साफसफाई करीत नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. ऐन दिवाळीत मक्तेदार कामचुकारपणा करत आहे. त्यात आरोग्य निरीक्षकही लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे कचरा असलेल्या भागातील आरोग्य निरीक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Jalgaon Municipal Corporation
MLA Patil Statement : ‘आनंदाचा शिधा’ चा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहचवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.