Diwali Special : दिवाळीत आकाशकंदील खरेदीस गर्दी ; Ecofriendly रोषणाईला अधिक मागणी

Lantern for selling in Diwali
Lantern for selling in Diwaliesakal
Updated on

जळगाव : वसूबारशीपासून सुरू होणाऱ्या दिवाळी मंगल पर्वास शुक्रवार (ता. २२)पासून सुरवात होत आहे. दिवाळीत आकाशकंदील, रोषणाई लावण्याची परंपरा आहे. यामुळे यंदा इकोफ्रेंडली रोषणाई आकाशकंदील खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

दिवाळी आठ दिवसांवर आली असून, घर आकर्षक रोषणाईने सजविण्यासाठी नागरिकांची आता लगबग दिसू लागली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसत असून, कंदील, लायटिंग तसेच पारंपरिक दिवे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे.

दिवाळी सण आला की बाजारपेठेत नवचैतन्य येते आणि बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने उजळून निघते. यंदा महागाई वाढलेली असली, तरी बाजारपेठेत ग्राहक खरेदीसाठी आता गर्दी करू लागले आहेत.(Diwali Special Rush to buy sky lanterns in Diwali More demand for Eco Friendly lighting Jalgaon Diwali News)

Lantern for selling in Diwali
Diwali Update : दिवाळी किट चे वाटप पिशव्यांविना रखडले

त्यात दिवाळीत घर सजावटीसाठी लागणारे आकाशकंदील, लायटिंग तसचे पणत्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेसह शहरातील मुख्य रस्त्यांवर दुकाने मोठ्या प्रमाणात सजलेली आहेत. त्यामुळे दिवाळीच्या बाजारपेठेने सर्व रस्ते हे उजळून निघालेले दिसत आहेत.

नागरिकांमध्ये झालेल्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक आकाशकंदील घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. कापडी, रंगीबेरंगी कागदी कंदील घेण्यासाठी नागरिकांचा कल अधिक दिसत आहे. सर्व प्रकारचे कंदील दीडशे रपयांपासून ते पाचशे रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत.

दिवाळीत लख्ख प्रकाशाने घर सजविण्यासाठी लहान लायटिंग वापरली जाते. झरणा मल्टी कलर, गोल्डन रंगाच्या लायटिंगला अधिक मागणी आहे. १०० मीटर, २०० मीटर लायटिंगच्या माळांनादेखील मागणी अधिक आहे. पाच सेटचा लहान कंदील, एलईडी पणत्या ३०० ते ३५० रुपयांपर्यंत मिळत आहेत.कर्नाटकमधून आलेल्या आर्टिफिशल पांढऱ्या रंगाचे तोरण, माळा उपलब्ध आहेत. हे तोरण खरेदीसाठी ग्राहकांचा कल दिसत आहे. लहान तोरण शंभर ते तीनशे रुपयांदरम्यान मिळत आहे.

Lantern for selling in Diwali
Crime Update : Most Wanted मुकुंद ठाकूरची अटकपूर्व जामिनासाठी धाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()