जळगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागात कोविड काळात बाधितांची आरोग्यसेवा आपला व कुटुंबाचा जीव धोक्यात घालणाऱ्या आशासेविकांनी सहा महिन्यांपासून त्यांच्या कामाचा मोबदला, वाढीव मानधन, प्रोत्साहन भत्ता, इतर देयके मिळाले नव्हते.
महानगर प्रशासनाकडे अकाउंट नसल्याने त्यांना वरील देयकापासून वंचित राहावे लागून दिवाळी अंधारात जाणार होती. मात्र महापालिकेतील आशासेविका, गट प्रवर्तक संघटनेने लढावू भूमिका घेत १९ ऑक्टोबरला कामबंद आंदोलन केले होते. यामुळे आशासेविकांना वरील देयके, भत्ता मिळाला आहे. यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे.(Diwali Update Asha workers diwali sweet by get payment allowance after agitation Jalgaon News)
आशासेविकांना त्यांच्या बँक खात्यात थकीत देयके मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी कणखर भूमिका छाया बिरारी, बबिता बाविस्कर, प्रतिभा काळे, योगीता कोळी, रत्नाबाई नाथजोगी, गार्गी जाधव, योगीता रोकडे, दीपाली कांबळस्कर, शोभा महाजन, कविता वाणी, पौर्णीमा वाणी, कविता मिस्त्री यांनी घेतली होती.
मोबदल्याशिवाय काम सुरू होणार नसल्याची नोटीसही प्रशासनाला दिली होती. यामुळे वरील थकीत मानधन, मोबदला अदा करण्यात आल्याने त्यांची दिवाळी गोड झाली आहे. मृणाली पाटील, विजय पवार, सविता बाविस्कर, जयश्री सपकाळे, सरोज मराठे आदींनी सहकार्य केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.