Diwali Update : दिवाळी किट चे वाटप पिशव्यांविना रखडले

Diwali Special News
Diwali Special News esakal
Updated on

जळगाव : राज्य शासनाने रेशन दुकानामार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो हरभराडाळ, एक लिटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा संच (दिवाळी किट) शंभर रुपयांत शासनाकडून देण्याचा निर्णय घेतला.

या किटमधील चारही जिन्नस रेशन दुकानदारांपर्यंत पोचल्या आहेत. मात्र या योजनेचे लाभार्थी आहेत सहा लाख २० हजार अन् पिशव्या आल्या आहेत केवळ ४२ हजार. यामुळे जिन्नस येऊनही किटचे वाटप रखडल्याची स्थिती जिल्ह्यात आहेत.

दिवाळी किटमधील जिन्नस (रवा, साखर, हरभराडाळ, पामतेल) व पिशव्या पुरविण्याचे कंत्राट शासनाने वेगवेगळ्या कंपन्यांना दिले आहे. यामुळे काही रेशन दुकानांत जिन्नसांपेकी काही वस्तू पोचल्या, काही पोचल्या नाहीत.(Diwali Update Distribution of Diwali kits stopped without bags Jalgaon News)

Diwali Special News
Crime Update : 6 वर्षे फरार संशयित अटकेत

काही ठिकाणी सर्वच जिन्नस वस्तू पोचल्या, मात्र किट तयार करून देण्यासाठी पिशव्या नाहीत, असे चित्र जिल्ह्यात आहे. यामुळे जिन्नस पोचूनही पिशव्यांशिवाय दिवाळी किटचे वाटप रखडले आहे. रेशन दुकानांवर लाभार्थी येऊन दिवाळी किट आल्याची विचारणा करीत आहेत. मात्र पिशव्या नसल्याचे रेशन दुकानदारांकडून सांगितले जात आहे.

शुक्रवारपासून दिवाळीचे पर्व सुरू होत आहे. त्याअगोदर लाभार्थ्यांना दिवाळी किटचे वाटप पिशवीत एकत्र करून देण्याचे आदेश आहेत. सोबत पिशव्यांशिवाय किटवाटप करू नये, अशाही सूचना आहेत. यामुळे जिल्हा पुरवठा विभाग, रेशन दुकानदार किट देण्यात हतबल झालेले दिसत आहेत.

Diwali Special News
Crime Update : Most Wanted मुकुंद ठाकूरची अटकपूर्व जामिनासाठी धाव

जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या सहा लाख २० हजार ६५० शिधापत्रिकांसाठी या निर्णयाचा लाभ होणार आहे. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानात दिवाळीपूर्वी जाऊन ई-पॉस मशिनवर आपला अंगठा प्रमाणित करून शिधाजिन्नस संच प्राप्त करून घ्यावेत. रास्त भाव दुकानदाराकडून शिधाजिन्नस संच घेतल्याची पावती घेऊन संचात चार पाकिटे असल्याची खात्री लाभार्थ्यांना करावयाची आहे.

"जिल्ह्यात काही ठिकाणी कंत्राटदाराकडून पिशव्या पोचल्या नाहीत. त्या उद्या (ता. २०)पर्यंत पोचतील. दिवाळी किट लाभार्थ्यांना पिशव्यांशिवाय देऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार सर्व जण कार्यवाही करीत आहेत. बहुतांश ठिकाणी जिन्नसवस्तू पोचल्या आहेत. पिशव्या उद्या पोचल्यानंतर लागलीच किटचे वाटप सुरू होईल."

-सुनील सूर्यवंशी,जिल्हा पुरवठा अधिकारी

Diwali Special News
Agriculture Update : शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ किलो साखर,दिवाळी भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()