Doctor commits suicide in jalgaon news
Doctor commits suicide in jalgaon newsesakal

Jalgaon News : ‘तापी’त उडी घेत डॉक्टरची आत्महत्या; चर्चा मात्र ‘सुसाईड नोट’ची

Published on

Jalgaon News : पाळधी (ता. धरणगाव) येथील डॉ. विश्‍वनाथ आर. पाटील यांनी मंगळवारी (ता. १५) सकाळी सहाच्या सुमारास तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. यामुळे कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

दलितमित्र डॉ. विश्‍वनाथ आर. पाटील (७५, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे मृत डॉक्टरांचे नाव आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच्या डॉक्टरांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Doctor commits suicide in jalgaon news)

डॉ. पाटील मंगळवारी कारने चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे आले होते. तापी नदीच्या पलावर त्यांची कार उभी केली. त्यानंतर डॉ. पाटील यांनी पुलावरुरून उडी घेतली. काही प्रत्यक्षदर्शीनी याबाबत मदतीसाठी प्रयत्नही केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पुलावर उभ्या असलेल्या कारवरून पुलावरुन उडी घेणारी व्यक्ती डॉ. पाटील असल्याची ओळख पटली.

पोलिसांकडून मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. चोपडा येथून पातोंडा माध्यमिक शाळेत नियमित ये-जा करणाऱ्या शिक्षकांनी सावखेडा पुलावर नॅनो कार (एमएच १९, एपी ४३९४) उभी असल्याचे पाहिले. तसेच पुलाजवळ गाडीच्या बाजूला बूट काढलेले दिसल्यावर त्यांनी सावखेडा येथील समाजसेवक पंकज पाटील यांना या संशयास्पद घटनेची माहिती दिली.

बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने तापी नदीपुलावर सावखेडा व निमगव्हाण येथील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. या कामी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, निमगव्हाण, तांदळवाडी, सावखेडा व मुंगसे येथील भरत निकम, सुधाकर पाटील, भानुदास पाटील, सावखेडा तलाठी सतीश शिंदे, मंडळ अधिकारी चौधरी, पातोंडा औटपोष्टचे बीट हवलदार संदेश पाटील, सुनील जाधव आदींच्या सहकार्याने दापोरी खुर्द, तांदळवाडी येथून पट्टीच्या पोहणारे विजय भिल, सचिन भिल, समाधान भिल यांनी दापोरी खुर्द , तांदळवाडी ते मठगव्हाण दोंदवाडे गावापर्यंत मृतदेहाचा शोध घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Doctor commits suicide in jalgaon news
Sharad Pawar : ना.धों. महानोर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली ; पवारांनी दिला आठवणींना उजाळा

दुपारी बाराच्या सुमारास मृतदेह मठगव्हाण गावाच्या काठावर आढळून आला. पोलिस कर्मचारी संदेश पाटील, सुनील जाधव, राहुल पाटील यांनी कायदेशीर कार्यवाही करत मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रूग्णालयात पाठविला. नातेवाईकांनी सुमारे साडेचारला मृतदेह ताब्यात घेतला.

डॉ. विश्‍वनाथ पाटील यांच्यामागे पत्नी, मुलगा राकेश, सून, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. पाटील यांचे पाळधीत मेन रोडवर कस्तुरबा हॉस्पिटल आहे. त्यांनी श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली होती. तसेच संत तुकाराम महाराज पंच मंडळाचेही ते अध्यक्ष होते. पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते असल्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून, यात त्यंचा दलितमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

‘सुसाईड नोट’ची चर्चा

‘‘मी वयाची ऐंशी वर्ष जगलो. जीवनात मी भरपूर कमावले असून, माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. आता जीवनात मला कोणतीही अपेक्षा शिल्लक नसून संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या प्रमाणे समाधी घेतली, त्याप्रमाणे मी माझ्या जीवनाचा प्रवास स्वतः संपवत आहे. त्यासाठी कुणीही जबाबदार नाही." अशा आशयाची चिठ्ठी डॉ. विश्वनाथ पाटील यांच्याकडे आढळून आल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.

Doctor commits suicide in jalgaon news
Jalgaon Dam Water : पारोळ्यातील प्रकल्प तहानलेले; अत्यल्प जलसाठ्याने चिंता वाढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.