Jalgaon: नर्मदा परिक्रमा करताना डॉक्टरांची रुग्णसेवा; पायी परीक्रमा करणारे नि. तु. पाटील IMAचे पहिलेच डॉक्टर

While serving patients in Narmada Parikrama, Dr. NY Patil
While serving patients in Narmada Parikrama, Dr. NY Patilesakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यातील वरणगाव येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ नि. तु. पाटील यांनी नर्मदा परिक्रमा करतानाच रुग्णसेवा देखील केली. मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या आश्रमातच त्यांची ओपीडी सुरू व्हायची.

अनेकांची तपासणी करून औषधे व इंजेक्शन देखील दिले. पायी परीक्रमा करणारे ते ‘आयएमए’चे पहिलेच डॉक्टर होते. (Doctor patient care while pradakshina Narmada Pedestrians NY Patil first doctor of IMA Jalgaon)

डॉ. पाटील यांनी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन सहा एप्रिलला नर्मदा परिक्रमेस सुरवात केली. १०८ दिवसांत तीन हजार ६०९ किलोमीटर अंतर पायी चालून पूर्ण केले.

वाटेत अनेक आश्रमात त्यांचा मुक्काम व्हायचा. डॉक्टर म्हणून ओळख झाल्यावर आपला आजार किंवा होणारा त्रास त्यांना परिक्रमावासी किंवा साधू सांगत. त्यांची तपासणी करून लगेच औषध देत होते.

संबंधित गावातील ग्रामस्थ देखील आपली दुखणी घेऊन येत होते. प्राथमिक औषधांचा साठा त्यांनी सोबत ठेवला होता. याबाबत ‘सकाळ’शी संवाद साधताना डॉ. पाटील म्हणतात, मां नर्मदा परिक्रमा करताना आपण डॉक्टर असल्याने सोबत काही औषधी न्यावी, हा विचार आधीच पक्का होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While serving patients in Narmada Parikrama, Dr. NY Patil
Ganeshotsav 2023: वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मंडपावर कारवाई! पोलिस आयुक्तांचा गणेश मंडळांना इशारा

त्यामुळे सोबत मी अतिसार, डोकधुखी, थकवा, ताप यावर विविध औषधी गोळ्या, बॅन्डेज आदी आणि १० ते १५ वेदनाशामक इंजेकशन सोबत घेतले होते. सहा एप्रिल हनुमान जन्मोत्सवाला ओंकारेश्वरपासून परिक्रमा सुरू केली.

माझ्याकडील औषधे संपली तेव्हा मध्यप्रदेश सरकारच्या सहायाने गावातील प्राथामिक आरोग्य केंद्रातून नवीन औषधी घ्यायचो. आरोग केद्राने मला सढळ हाताने औषधी पुरवली.

परिक्रमा करताना हातपाय दुखणे, थकवा जाणवणे, उलटी होणे, अतिसार असे विविध आजार परिक्रमावासीयांना सुरवातीच्या दिवसात होतात. त्यामुळे मातेने ही सेवा माझ्या हातून करून घेतली.

"अध्यात्मिक व धार्मिक परीक्रमा करत असतानाच नर्मदा मातेने माझ्या हातून रुग्णसेवा करण्याचा योग जुळवून आणला, हे मी माझे भाग्य समजतो. नक्कीच यामुळे परिक्रमेचा आनंद द्विगुणीत झाला, मातेचा व रुग्णांचा आशीर्वाद मिळाला, असे मी मानतो."

- डॉ. नि. तु. पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ, वरणगाव, ता. भुसावळ

While serving patients in Narmada Parikrama, Dr. NY Patil
Ganeshotsav 2023: गुलशनाबादमध्ये कृत्रिम फुलांची बाजारपेठ फुलली! गणेशोत्सवानिमित्त मागणी वाढली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.