जळगाव : मातेसह बाळासाठी डॉक्टरच ‘देवदूत’

Dr. Sandip Chavan blood donation
Dr. Sandip Chavan blood donationesakal
Updated on

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील शिंदी येथील आरोग्य उपकेंद्रात प्रसूतीसाठी (Delivery) आलेल्या विवाहितेचा प्रसूतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्या ठिकाणी रक्तदाताच नसल्याने मातेसह बाळाचा जीव धोक्यात होता. मात्र, आपल्या प्रसंगावधानाने डॉ. संदीप चव्हाण यांनी रक्तदान (Blood Donation) करून दोघांचा जीव वाचविला. (Doctor sandip chavan Donated blood for mother of newborn during delivery Jalgaon News)

तालुक्यातील शिंदी येथील रुपाली विजय भिल (वय २२) या गुरुवारी (ता. २३) शिंदी येथील आरोग्य उपकेंद्रात प्रसूतीसाठी आल्या. तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप चव्हाण यांनी त्यांची प्रथम रक्तचाचणी करून घेतली. विवाहितेला रक्त कमी असल्याचे अहवालातून कळाले. त्यावर उपकेंद्रात रक्तासाठी शोधाशोध केली असता एकही रक्तदाता मिळाला नाही. त्यात प्रसूतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यामुळे रुपालीसह बाळाची प्रकृती अधिक खालवायला लागली.

योगायोग वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह निघाला. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी या विवाहितेला रक्तदान केले आणि महिलेचे सुखरूप बाळंतपण झाले असून, या वेळी तिने गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला आहे. मातेसह दोघेही सुखरूप आहेत. यासाठी डॉ. संदीप चव्हाण हे खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहेत. अलीकडच्या काळात डॉक्टर म्हणजे आर्थिक पिळवणूक करणारा घटक, असा समज रूढ होत आहे. परंतु यास डॉ. चव्हाण अपवाद ठरले आहेत. दरम्यान, डॉक्टर स्वतः देखील रुग्णांसाठी रक्तदान करू शकतात. हे या घटनेतून दिसून आले आहे. डॉ. चव्हाण यांनी घडविलेल्या माणुसकीच्या दर्शनाविषयी ठिकठिकाणाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Dr. Sandip Chavan blood donation
Jalgaon : जुन्या वादातून मुलास बेदम मारहाण

"महिलाच्या प्रस्तूतीदरम्यान रक्तस्त्राव अधिक झाल्यामुळे रक्तदाब कमी झाला व प्रकृती अतिशय चिंताजनक झाली होती. त्याचवेळी तातडीने रक्तपुरवठा करण्याची गरज होती. परंतु कोणीही त्याठिकाणी रक्तदाता उपस्थित नव्हता. अखेरीस मीच स्वत: रक्तदान केले व मातेसह बाळाचा प्राण वाचविण्यात यश आले."

- डॉ. संदीप चव्हाण, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य उपकेंद्र, शिंदी (ता. चाळीसगाव)

Dr. Sandip Chavan blood donation
सत्तेच्या सारीपाटात आम्हाला मदत मिळणार तरी कशी?; शेतकऱ्यांची आर्त हाक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.