Jalgaon : डुकराच्या तावडीत सापडलेल्या बालकाला कुत्र्याने वाचविले

pig attacked child
pig attacked childesakal
Updated on

अमळनेर (जि. जळगाव) : पाळीव कुत्रा (Dog) घरातील माणसांप्रति किती प्रामाणिक असतो, याचा प्रत्यय येथील कलागुरू ड्रीम सिटीत गुरुवारी (ता. २) सायंकाळी आला. अंगणात खेळणाऱ्या लहान बालकावर (Child) हल्ला (Attack) करीत त्याला चावा घेणाऱ्या डुकराला (Pig) पाळीव कुत्र्याने हुसकून लावत बालकाचे प्राण वाचविले. (Dog rescues child attacked by pig Jalgaon News)

येथील निवृत्त जवान नरेंद्र पाटील यांचा सात वर्षांचा मुलगा नकुल अंगणात खेळत होता. खेळत असताना त्याच्यावर डुकराने अचानक हल्ला केला व त्याच्या गालावर चावा घेतला. या प्रकाराने नकुल भेदरला. डुक्कर त्याच्यावर आणखी हल्ला करण्याच्या तयारीत असताना, नरेंद्र पाटील यांनी पाळलेल्या कुत्र्याचे त्याकडे लक्ष जाताच, त्याने वेगाने धावत डुकराला चावा घेत त्याच्यापासून बालकाला सोडविले. या ठिकाणी नरेंद्र पाटील यांचा कुत्रा नसता, तर डुकराने आणखी चावा घेऊन त्यांच्या मुलाला गंभीर जखमी केले असते.

pig attacked child
साडेसहा लाख गुन्हेगारांची ‘कुंडली’ एका क्लिकवर

मात्र, कुत्र्यामुळे अनुचित घटना टळली. दरम्यान, कलागुरू ड्रीम सिटी परिसरात मोकाट डुकरांनी अक्षरशः थैमान घातले आहे. या भागात काही दिवसांत डुकरांची संख्या कमालीची वाढली आहे. यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कलागुरू ड्रीम सिटीसह रवीनगर, सर्वज्ञनगर भागातही डुकरांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने मोकाट डुकरांचा (Stray Pigs) तातडीने बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन रहिवाशांनी पालिकेला दिले आहे.

pig attacked child
कजगावची केळी हद्दपार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()