Success Story : सैन्यदलात मराठी अधिकाऱ्यांचा टक्का फारच कमी असतो. त्यातच ‘एअरफोर्स’ अर्थात हवाई दलात तर मराठी अधिकारी फारच नगण्य दिसून येतात.
या सर्व गोष्टींना तिलांजली देत अमळनेर येथील तांबेपुरा भागातील रहिवासी डॉ. घनश्याम नागराज पाटील यांनी एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्टमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
संपूर्ण भारतातून त्यांच्याबरोबर १९९ युवा अधिकारी हे ‘फ्लाइंग ऑफिसर’ म्हणून नियुक्त होणार आहेत. (Dr Ghanshyam Patil will be appointed as Flying Officer jalgaon news)
या घटनेमुळे डॉ. घनश्याम यांचे सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सैन्यदलात अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी दरवर्षी यूपीएससी अर्थात भारतीय लोकसेवा आयोगातर्फे ‘सीडीएस’, ‘एनडीए’ यांसारख्या परीक्षा घेतल्या जातात. त्याच काठिण्य पातळीवर आधारित एअरफोर्समध्येही एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्टच्या माध्यमातून उच्च अधिकारी निवडले जातात.
विशेष म्हणजे, या परीक्षेत दोन वेळा गुणवत्ता यादीतून जावे लागते. डॉ. घनश्याम पाटील यांच्यासह देशभरातील सुमारे सात लाखांपेक्षाही जास्त उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यात ‘एसएसबी’साठी ५० हजार उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यातून सुमारे ३०० उमेदवारांची निवड होऊन वैद्यकीय चाचण्याही घेण्यात आल्या.
डॉ. घनश्याम यांनी पहिल्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाल्यावर पुन्हा दुसऱ्या गुणवत्ता यादीतही आपले वर्चस्व कायम राखत एअरफोर्समध्ये ‘फ्लाइंग ऑफिसर’ होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सध्या ते हैदराबाद- तेलंगणा येथील एअरफोर्स ॲकॅडमीत एक वर्षासाठी प्रशिक्षण घेत आहेत. येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे प्रभारी कमांडंट तथा सुभेदार मेजर नागराज पाटील व कविता पाटील यांचे ते पुत्र आहेत.
‘डॉक्टरकी’साठी सोडले अधिकारीपद
डॉ. घनश्याम पाटील यांनी मुंबई येथील आर. ए. पोदार वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेत असतानाच भारतीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या ‘सीडीएस’ परीक्षेत संपूर्ण भारतातून १३ वा क्रमांक व एसएसबी परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमीत त्यांचे चार महिन्यांचे प्रशिक्षण झाले होते.
त्यातच डॉक्टरकीचे इंटरशिप पूर्ण करायचे होते. कोणते तरी एकच प्रशिक्षण पूर्ण करता येईल, यासाठी डॉ. घनश्याम यांनी अधिकारीपदाच्या प्रशिक्षणावर पाणी सोडत ‘डॉक्टरकी’ धर्माला प्राधान्य दिले. इंटरशिप झाल्यानंतर पुन्हा अपूर्ण राहिलेले प्रशिक्षण पूर्ण करता येत नाही, ही खंत मनात होतीच.
आपण आता पूर्ण ‘डॉक्टरकी’ शिक्षण घेतले आहे. पहिले स्वप्न पूर्ण झाले. मात्र, दुसरे सैन्यदलात अधिकारी होण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा जिद्द आणि चिकाटीने अभ्यासात सातत्य ठेवले अन् शेवटी एअरफोर्समध्ये ‘फ्लाइंग ऑफिसर’ अर्थात सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.