Jalgaon News: महापालिका कर्मचाऱ्यांना डिसेंबरच्या वेतनात मिळणार सातवा वेतन आयोग : डॉ. विद्या गायकवाड

7th pay commission
7th pay commissionesakal
Updated on

Jalgaon News : सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या जोरदार लढ्याला आता यश आले आहे. ११६६ कर्मचाऱ्यांना डिसेंबरच्या वेतनात सातव्या वेतन आयोगाची रक्कम मिळणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. परंतु ११६६ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्‍न निर्माण झाला होता.(Dr. Vidya Gaikwad statement of Seventh Pay Commission will get municipal employees in December salary)

याबाबत आयुक्त डॉ. गायकवाड यांनी माहिती दिली.

मनपा उपायुक्त अविनाश गांगोडे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, प्रभारी सहाय्यक आयुक्त उदय पाटील या वेळी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना आयुक्त डॉ. गायकवाड यांनी म्हणाल्या, की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत महापालिका प्रयत्नशील असून, प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांवर विशेष लेखा परिक्षण अहवालात आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करण्यात अडथळे निर्माण झाले होते. परंतु गेल्या महिन्यात शासनाकडून आक्षेप असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी वयाधिक्य असलेल्या कर्मचाऱ्यांचे वय क्षमापित करण्यात आले असून, शैक्षणिक अर्हता नसलेल्यांनादेखील क्षमापित करण्यात आले आहे.

7th pay commission
Jalgaon News: दिवाळीपूर्वी 54 हजार शेतकऱ्यांना मिळणार फळपीक विम्याचा लाभ

तसेच आक्षेप असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या नियमित करण्यात आल्या आहेत. परंतु यापैकी उड्डाण पदोन्नती झालेल्या ३७८ कर्मचाऱ्यांविषयी आयुक्तांनी तपासून निर्णय घ्यावा, असे शासनाने आदेशित केले आहे.

या ३७८ पैकी २५८ कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून, २३ कर्मचारी मयत झाले आहेत. त्यामुळे पदोन्नतीमधील ९७ कर्मचारी आता शिल्लक राहिले असून, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.

7th pay commission
Jalgaon News : अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची बदली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.