Jalgaon News : रेल्वे विभागाला 133 कोटींचा महसूल : डीआरएम- इती पांडे

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने डिसेंबर मध्ये १३३.५७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला.
Revenue Collection
Revenue Collectionesakal
Updated on

Jalgaon News : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने डिसेंबर मध्ये १३३.५७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला.

विभागाने महसुल वाढीचे उद्दिष्ट ओलांडून आणि विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ साधताना अपवादात्मक कामगिरीचे प्रदर्शन केल्याची माहिती भुसावळ रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) इती पांडे यांनी दिली. (DRM Iti Pandey Statement of 133 crore revenue to Railway Department jalgaon news )

प्रवाशांच्या महसुलाच्या बाबतीत, भुसावळ विभागाला डिसेंबर २०२३ मध्ये ७२.८९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. डिसेंबरपर्यंत ४ कोटी ५४ लाख कमाईसह तिकीट तपासणीने या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

विविध कोचिंग अ‍ॅक्टिव्हिटींमधून मिळणाऱ्या महसूलही ८ कोटी ३९ लाखांवर पोहोचला आहे. विविध सेवा देण्याच्या विभागाच्या वचनबद्धतेमुळे माल वाहतुकीतून ५० कोटी ६८ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालगाड्यांनी मोटारगाड्या, पेट्रोलियम उत्पादने, कांदे, अन्नधान्य आणि सिमेंट वॅगनसह विविध प्रकारच्या मालाची वाहतूक केली.

पार्सल सेवांनी एकूण ३ कोटी २२ लाख रूपयांची कमाई केली, जे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यात भुसावळ मंडळाची अष्टपैलुत्व दर्शवते. एकंदरीत, भुसावळ मंडळाने डिसेंबर २०२३ मध्ये १३३ कोटी ५७ लाखांची उल्लेखनीय कमाई केली.वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक धीरेंद्र सिंग यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, विभागाला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा मिळाली आहे.

Revenue Collection
Jalgaon News : जळगावलगत खेडी शिवारात साकारणार वारकरी भवन; 150 भक्तांची निवासव्यवस्था

डिसेंबर महिण्यातील कामगिरी

* नाशिकच्या गोदामातून ७९७ वॅगनमधील ३३३० गाड्यांची वाहतूक

* अंकाई किल्ला स्टेशन १४ डिसेंबरला पार्सल लोडिंगसाठी सुरु

* भुसावळ स्थानकावर ५ वर्षाचे एसी वेटिंग लाउंजचा १० लाख ५८ हजारांना कंत्राट

* भुसावळ रेल्वे हेरिटेज संग्रहालयाला पाच वर्षांसाठी १६ लाख १४ हजारांना दिले

* भुसावळ विभागातील १३ स्थानकांवर एटीएमचे कंत्राट २ लाख ५१ हजारांना पाच वर्षांसाठी देण्यात आले.

* भुसावळ विभागातील पाच स्थानकांवर जाहिरातीसाठी १० लाख ६१ हजार तीन वर्षांसाठी देण्यात आले.

* तीन स्थानकांवर जाहिरात होर्डिंग्जचे कंत्राट ५.२१ लाख रुपयांना पाच वर्षांसाठी देण्यात आले.

Revenue Collection
Jalgaon News : राष्ट्रीय संशोधनात जळगाव ‘GMC’चा सहभाग; अचानक होणाऱ्या मृत्युंविषयी केले संशोधन

भुसावळ विभागात पंचवटी वाहनावर विनाइल बॅनर चिकटविण्यासाठी तीन वर्षांसाठी १० लाख रुपये देण्यात आले.

''हे यश संपूर्ण टीमचे समर्पण आणि परिश्रम दर्शवते. सक्रिय सहभाग यामुळे विभागाची प्रशंसनीय कामगिरी झाली आहे आणि एक मानक स्थापित केला आहे. रेल्वे क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.''-इती पांडे, डीआरएम भुसावळ

Revenue Collection
Jalgaon News: धरणगावातील स्मृती स्थळांसाठी 9 कोटी मंजूर; पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून निधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.