Jalgaon Crime News : जळगावमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचे रॅकेट सक्रिय; ‘थर्टी फर्स्ट’ला एकावर कारवाई

जळगाव शहरातील शाहूनगर भागात ड्रग्ज, गांजा आणि इतर अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.
drug
drugesakal
Updated on

Jalgaon Crime News : जळगाव शहरातील शाहूनगर भागात ड्रग्ज, गांजा आणि इतर अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. मात्र, कारवाई करण्यासाठी ‘कॉन्टेटी’ मिळत नाही म्हणून कारवाई होऊ शकली नाही.

‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री शाहूनगर कॉम्प्लेक्सजवळ तीन हजार रुपयांच्या एमडी ड्रग्जसह एकाला अटक करण्यात आली. शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Drug dealers racket active in Jalgaon crime news)

संमिश्र वस्ती असलेल्या शाहूनगर परिसरात अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अनेक दिवसांपासून इथल्या पानटपऱ्यांवर आणि घराच्या दारातील दुकानांमध्ये गुटखा-सिगारेटसह गांजाच्या सिगारेटची विक्री होत असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र त्याविरोधात कारवाई होत नसल्याने धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘थर्टी फर्स्ट’ (ता. ३१) सायंकाळी साडेसातला मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकून शाहरुख सिराज भिस्ती (वय २८, रा. शाहूनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत तीन हजार रुपये किमतीचा पाच ग्रॅम एमडी अमली पदार्थ आढळून आला. पोलिस नाईक सचिन साळुंखे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन पोलिस ठाण्यांची हद्द

जिल्‍हापेठ पोलिस ठाणे आणि शहर पोलिस ठाणे, अशा दोन पोलिस ठाण्यांची संयुक्त हद्द आहे. अशा शाहूनगरमध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांनी कारवाईची भीती दाखवली, की रस्ता ओलांडून दुसऱ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत धंदा चालविला जातो. कारवाई होण्यापूर्वी माहिती पोहोचते. किरकोळ कारवाई होऊन पुन्हा धंदा ‘जैसे-थे’ सुरू होतो.

drug
Jalgaon Crime News: मुले पकडणारी टोळी असल्याच्या संशयावरून 4 तरुणांना मारहाण

उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकातील उपनिरीक्षक किशोर पवार, सचिन साळुंखे, किशेार निकुंभ, रतन गिते यांच्या पथकाने ‘थर्टी फर्स्ट’निमित्त केलेल्या तपासणी मोहिमेत एका तरुणाकडे तीन हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज‌ मिळून आले. जिल्‍हापेठ पोलिसांनी ट्राफीक गार्डन परिसरातील सट्टा पेढीवर कारवाई केली.

रिकाम्या घरांचा वापर

शाहूनगर ट्राफीक गार्डन परिसर अवैध धंद्याचे आगार बनले आहे. चारही बाजूने शाहूनगर पोलिस कर्मचारी वसाहत असून, मध्यभागी मोकळी जागा असल्याने या ठिकाणी सट्टा, पत्ता, जुगारसह इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. इथले पोलिस कर्मचारी घर सोडून नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्याने बंद पडलेल्या खोल्या आता अवैध धंदेवाईकांकडून वापरल्या जात आहेत.

drug
Jalgaon Crime News : तोतया पोलिसाने उतरविल्या वृद्धेच्या बांगड्या; गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.