Jalgoan Water Crisis : चोरवड रस्त्या जवळील गरीब नवाज नगर येथे नवीन पाईपलाईनचे काम सुरू होते. त्याच वेळी या परिसरात पिण्याचे पाणी जुन्या झोन द्वारे सुरू होते. दरम्यान लोकप्रतिनिधी यांनी संबंधित ठेकेदाराला यंत्राचा वापर न करता मनुष्यबळाचा वापर करावा.
तसेच गरीब नवाज नगर येथे पंधरा दिवसानंतर पिण्याचे पाणी सोडले आहे. पाणी पूर्ण झाल्यानंतर आपले काम सुरळीत करावे, अशी विनंती करून देखील संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे यंत्राच्या साह्याने खोदकाम केल्यामुळे अखेर सहा इंच पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. (due to contractor Use of JCB instead of manpower wasted lakhs of liters of drinking water of Parola city Jalgaon)
त्यामुळे इतर वसाहतीधारकांना दोन-तीन दिवस उशिरा पाणी मिळणार असून संबंधित ठेकेदाराच्या या मुजोरी पणामुळे संपूर्ण शहराचे पाणी चे नियोजन कोलमळणार असून याला जबाबदार कोण? अशी भूमिका गरीब नवाज नगर परिसरातील रहिवासी धारकांनी घेतली असून जनतेचा वाया जाणारा पैसा याची जाणीव ठेवत संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी.
तसेच मनमानी कारभाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संबंधित रहिवाशी धारकांसह माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, नगरसेवक एडवोकेट रोहन मोरे यांनी केली आहे.
ता. 16 रोजी नेहमीप्रमाणे गरीब नवाज परिसराच्या झोन मधून रहिवाशी धारकांना पाणी सोडले जात होते. त्याचवेळी नवीन पाईपलाईन चे काम या परिसरात सुरू होते.
दरम्यान माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील व नगरसेवक एडवोकेट रोहन मोरे यांनी संबंधित ठेकेदाराला भ्रमणध्वनी वरून सदर घटनेबाबत माहिती दिली.
दरम्यान पाईपलाईन खोदकाम करतेवेळी काही वेळ मनुष्यबळाचा वापर देखील करण्यात आला. मात्र काही काळातच पुन्हा जेसीबीच्या साह्याने
खोदकाम करण्यात आले. त्याच वेळी सहा ईंची पाईपावरून गरीब नवाज नगर परिसरात पाणीपुरवठा सुरू होता. दरम्यान संबंधित ठेकेदाराला सांगून देखील त्याने हलगर्जीपणा दाखवल्याने सहा इंची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले.
पाईपलाईन फुटल्यामुळे शहराचे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडणार
गरीब नवाज नगर परिसरात पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. परिणामी दुसऱ्या दिवशी बालाजी नगर, आशापुरी नगर, द्वारका नगर, सिद्धिविनायक नगर आराध्या नगर, आस्था नगर या परिसरात पाणीपुरवठा केला जाणार होता.
मात्र लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे पुन्हा पाण्याच्या टाक्या भरण्यात येतील. तसेच गरीब नवाज नगर परिसरातील पाईपलाईन दुरुस्त करण्यात येईल.
तेव्हाच वरील नगर परिसरात पाणीपुरवठा करण्यात येईल. पर्यायाने शहरातील पाणीपुरवठा पुन्हा एक ते दोन दिवस उशिराने होईल. त्यामुळे ठेकेदाराच्या या चुकीच्या परिणाम शहरवासी यांना भोगावा लागेल असे चर्चा परिसरात दिसून आली.
दरम्यान शहरात आधीच पंधरा दिवसांनी येणारे पाणी त्यात होणारी दिरंगाई यामुळे प्रशासक व प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्याचे यावेळी दिसून आले.
"खोदकाम करताना नजरचुकीने पाईपलाईन फुटली. मात्र तात्काळ पाईपलाईन जोडण्यात आली."- आर.व्ही महाजन, प्रतिनिधी, प्रगती कंट्रक्शन
"संबंधित ठेकेदाराकडून फुटलेला पाईपलांची जोडणी सुरू आहे. तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत कसा करण्यात येईल याबाबत नियोजन सुरू आहे."
- सत्यम पाटील, पाणीपुरवठा अभियंता
शिवाजीनगर परिसरात पाण्याचा दुर्गंध
शहरातील शिवाजीनगर परिसरात काल पंधरा रोजी पिण्याचे पाणी सोडण्यात आले. मात्र सदर पाण्याचा दुर्गंध येत असल्याची माहिती तेथील रहिवासी धारकांनी दिली.
त्यामुळे नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन आरोग्याला बाधा होणार नाही असा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.