Jalgaon News : जी- २० देशांच्या संमेलनात शनिवारी (ता. ९) मंजुरी दिलेल्या आर्थिक कॉरिडॉरमुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील केळी युरोपातील विविध देशांत निर्यात होण्याचा मार्ग मोकळा होईल.
या संभाव्य निर्यातीचे आतापासून नियोजन केल्यास आगामी दहा वर्षांत खानदेशी केळीला जागतिक स्तरावर, विशेषत: युरोपात मोठी बाजारपेठ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Due to corridor banana of Jalgaon will have good day 10 years of planning required Jalgaon News)
नवी दिल्ली येथे जी- २० देशांचे संमेलन सुरू आहे. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या आर्थिक कॉरिडॉरची घोषणा केली आहे.
यामुळे भारत, संयुक्त अरब राष्ट्रे, सौदी अरब, युरोपियन महासंघ, इटली, जर्मनी, फ्रान्स व अमेरिका या देशांशी रेल्वे आणि समुद्रमार्गे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात सुरवात होईल.
सध्या या व्यापाराला समुद्रमार्गे सुरवात करण्यात येणार असून, भविष्यात रेल्वेमार्गही उभारण्यात येणार आहे. चीनच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी या कॉरिडॉरची निर्मिती होणार असली, तरी भारतीय केळीचा यामुळे मोठा फायदा होण्याची शक्यता वाढली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या कॉरिडॉरमुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील केळी कोणत्याही अडथळ्याविना मध्य पूर्वेकडील राष्ट्रांसह युरोपातही पोहोचण्यास मदत होणार आहे. या कॉरिडॉरमुळे भारतीय चलनाचे अमेरिकन डॉलरमध्ये रूपांतर होण्यासाठी मदत होईल.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ही घोषणा केली असल्याने तिची अंमलबजावणी तातडीने सुरू होईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील केळी उत्पादक करीत आहेत. त्यामुळे या आर्थिक कॉरिडॉरचे जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी स्वागत केले.
"खानदेशी केळी मध्यपूर्वेतील देशांपर्यंत पोहोचते; पण त्यातही काही अडथळे येतात. या नियोजित कॉरिडॉरमुळे आता युरोपीय बाजारपेठेपर्यंत खानदेशी केळी पोहोचू शकेल. यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा येत्या १० वर्षांत मोठा फायदा होणे अपेक्षित आहे."- विशाल अग्रवाल, निर्यातदार, केळी उत्पादक शेतकरी, अटवाडा, ता. रावेर (जि. जळगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.