Villagers participating in monkey response.
Villagers participating in monkey response.

Jalgaon News: वानराच्या मृत्युनंतर 400 ग्रामस्थांचे मुंडण; दिवाळी साजरी न करता पाळला दुखवटा

Published on

Jalgaon News : भालगाव (ता. एरंडोल) येथे विजेचा धक्का बसून वानराचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांनी वानरावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. वानरास श्रद्धांजली म्हणून सर्व ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केली नाही. वानराचे धार्मिक पद्धतीने उत्तरकार्य करून लोकवर्गणीतून सुमारे तीन हजार

नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच चारशे ग्रामस्थांनी मुंडण करून गावात पाच दिवस दुखवटा पाळण्यात आला. (Due to death of monkey villagers performed ritual funeral for monkey jalgaon news)

प्रभूरामचंद्रांचे सैनिक म्हणून वानरांकडे पाहिले जाते. भालगाव येथे ८ नोव्हेंबरला सकाळी अकराच्या सुमारास श्री विठ्ठल मंदिराजवळ विजेचा धक्का लागून वानराचा मृत्यू झाला. विजेच्या धक्क्याने वानराचा मृत्यू झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी करून झालेल्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला. ग्रामस्थांनी एकत्र येऊन वानरावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन केले. गावातील युवकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली.

गावातून वाजतगाजत अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये स्थानिक भजनीमंडळाचे सदस्य देखील सहभागी झाले होते. अंत्ययात्रेत सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते. दिवाळीपूर्वी वानराचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. दिवाळीत गावात रोषणाई करण्यात आली नाही अथवा फटाके फोडण्यात आले नाहीत.

Villagers participating in monkey response.
Jalgaon News: पाडळसे प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही : मंत्री अनिल पाटील

पाच दिवस दुखवटा पाळल्यानंतर रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वानराचे धार्मिक आणि विधिवत विधी करून उत्तरकार्य करण्यात आले. सुमारे चारशे ग्रामस्थांनी सामूहिक मुंडण करून वानरास श्रद्धांजली वाहिली. यामध्ये युवक व शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. उत्तरकार्याच्या दिवशी भालगावसह तरखेडे, बोरगाव, नंदगाव यासह परिसरातील सुमारे तीन हजार नागरिकांना अन्नदान करण्यात आले.

भालगावचे नवनिर्वाचित सरपंच गोविंदा मराठे यांनी शिऱ्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच अन्नदानाचा खर्च सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्यात आला. पंचायत समितीचे माजी उपसभापती देविदास मराठे, विकास संस्थेचे अध्यक्ष नामदेव पाटील, माजी अध्यक्ष श्रीराम मराठे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास चव्हाण, पोलिस पाटील रमेश मराठे, माजी सरपंच नारायण सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य किरण मराठे, ईश्वर मराठे, छोटू मराठे, ज्ञानेश्वर मराठे, लोटन पाटील, कैलास मराठे, भास्कर मराठे, प्रभाकर मराठे, धुडकू पाटील, शंकर भिल, शालिक पारधी, सुकलाल ठाकूर, नाना महाजन, रवींद्र शिंदे यांचेसह ग्रामस्थ व युवक मंडळाच्या सदस्यांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेतला.

Villagers participating in monkey response.
Jalgaon News: ‘टॉवर चौक’ वाहतूक सुरक्षा मॉडेल; नियम मोडल्यास कॅमेऱ्याद्वारे दंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()