Jalgaon News : जळगाव जिल्हा पोलिस पोलिस दलाच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.७) रात्रभर नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहीम राबवली.
जिल्हाभरात राबवलेल्या या मोहिमेत ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह सह बेशिस्त वाहनधारंकावर कारवाई करण्यात आली. (due to Diwali on vehicle inspection campaign was carried out by police jalgaon news)
जळगाव शहरात २ लाख १० हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात वाहतूक नाकाबंदीचा ड्राईव्ह घेण्यात आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हाभरात चाळीस ठिकाणांवर नाकेबंदी लावून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारीसंह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या नाकाबंदी करून वाहन तपासणीस प्रारंभ केला.
जवळपास रात्रभर चाललेल्या या कारवाईत १ हजार ९२४ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात मद्यपी (ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह), दस्तवेज तपासणी, करण्यात आली.
तपासणी मोहिमेत शहर उपविभागात १२ पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि १७० पोलिस अंमलदारांचा सहभाग होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.