Jalgaon News : पावसाअभावी उडीद, मुगाचा पेरा घटणार : कृषी विभाग

Agriculture Department
Agriculture Departmentesakal
Updated on

Jalgaon News : जून महिन्याचे २० दिवस उलटले, तरी जिल्ह्यात अद्याप मॉन्सूनचे आगमन झालेले नाही. परिणामी, उडीद, मुगाच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे या पिकांचा पेरा घटणार आहे. मात्र तूर, बाजरीची पेरणी जुलैअखेरपर्यंत केली तरी त्याचे उत्पादन चांगले येईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा कडक उन्हाळा होता. त्यामुळे मॉन्सूनही लांबला. मॉन्सून महाराष्ट्रात सक्रिय होण्याची चिन्हे असतानाच बिपरजॉय वादळाचा फटका मॉन्सूनला बसला. एरवी मृग नक्षत्रावर आगमन होणाऱ्या मॉन्सूनचे अद्यापही आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.(Due to lack of rain sowing of Udid Muga will decrease Agriculture Department Sowing of tur millets continue till end of July Jalgaon News)

जिल्ह्यात मृग नक्षत्र सुरू होताच मॉन्सूनचे आगमन होते. शेतकरी पेरण्यांना लागतात. यंदा मात्र तसे झालेले नाही. पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्याचा परिणाम मूग, उडीदच्या पेरण्यांवर झाला आहे. अद्याप या पेरण्या न झाल्याने उत्पादनात घट येणार आहे. केव्हा एकदाचा पाऊस पडेल अन्‌ पेरण्या करू, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.

जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सात लाख ५० हजार हेक्टर आहे. त्यापैकी साडेपाच लाख हेक्टरवर कापसाचा पेरा होतो.

बागायतदार शेतकऱ्यांनी ४६ टक्के कापसाच्या पेरण्या केल्या आहेत. त्यांच्याकडील विहिरींना पाणी असल्याने त्यांनी कापसाला पाणी देणे सुरू केले आहे. दुसरीकडे मात्र कोरडवाहू शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच पाऊस पडावा, यासाठी वरुणराजाला साकडे घातले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Agriculture Department
Jalgaon Crime News : थोरगव्हाण शिवारातून नळ्या, पाइप लंपास

"जिल्ह्यात कोरडवाहू पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. बागायतदारांनी मात्र कापसाच्या पेरण्या केल्या आहेत. कोरडवाहू शेतकरी जुलैअखेरपर्यंत तूर, बाजरीचा पेरा करून चांगले उत्पादन घेऊ शकतात. २५ जून ते १० जुलैदरम्यान राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज आहे."

-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

२४ पासून जिल्ह्यात पाऊस

जिल्ह्यात २४ पासून जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र पाऊस कोठे पडेल, कोठे पडणार नाही. २४ जून ते २ जुलैदरम्यान होणारा पाऊस पडलेली तूट भरून काढण्याची शक्यता आहे. आता बिपरजॉय वादळाचे संकट टळले आहे. मॉन्सूनच्या आगमनाला त्याचा अडथळा होता. तो आता दूर झाला आहे, असे हवामान अभ्यास नीलेश गोरे यांनी सांगितले.

Agriculture Department
Jalgaon News : रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींवर कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.