Unseasonal Rain : मोडून पडला संसार..मेंढपाळांवर फाटले आभाळ; जिवापाड जपलेली मेंढरं पुरताना अश्रू अनावर!

Shepherd sisters wailing as their sheep died in the hailstorm.
Shepherd sisters wailing as their sheep died in the hailstorm.esakal
Updated on

Jalgaon News : ‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा...! या काव्यपंक्तीची आठवण व्हावी, असे विदारक दृष्य सोनाळा फाट्यावर मेंढपाळांच्या वाड्यावर अनुभवास आले. (due to unseasonal rain heavy hail 135 sheep died in jamner jalgaon news)

पहूर -जामनेर मार्गावरील सोनाळा फाट्याजवळ नांदगाव येथून आलेल्या शेतात बसलेल्या मेंढपाळांच्या सुमारे १३५ मेंढ्या रविवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात मृत्युमुखी पडल्या तर ७५ मेंढ्या धरणात वाहून गेल्या. आयुष्यभर जिवापाड जपलेल्या या मेंढ्यांवर अंत्यसंस्कार करताना मेंढपाळांना रडूच कोसळले.

पाच ते सहा दिवसांपासून परिसरात तसेच पिंपळगाव गोलाईत शिवारात खोकर तळा या ठिकाणी शेतकरी देवराज राजाराम पाटील यांच्या शेतात बाणगाव (ता.नांदगाव, जि.नाशिक) येथील भगवान सदाशिव गोळेकर, सीताराम सदाशिव गोळेकर, प्रल्हाद सदाशिव गोळेकर, शांताराम सदाशिव गोळेकर, अरुण सदाशिव गोळेकर, पंकज सदाशिव गोळेकर या सहा मेंढपाळ बांधवांचे असून,

सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास अचानक आलेल्या गारपीट चक्रीवादळ व अवकाळी पावसाच्या तडाख्यात त्यांच्या वाड्यातील ८०० ते ९०० मेंढ्या असून, त्यापैकी १३५ मेंढ्या गारपिटीच्या तडाख्यात मृत्युमुखी पडल्या तर ७५ मेंढ्या शेजारी असलेल्या नाल्यातून वाहून गेल्याचे सांगण्यात आले, असे एकूण ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याचे भगवान गोळेकर या मेंढपाळ बांधवाने सांगितले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Shepherd sisters wailing as their sheep died in the hailstorm.
Amrut Yojana : तब्बल 45 कॉलन्यांत या तारखेपासून ‘अमृत’चे पाणी; नवी जोडणीचे आवाहन

या वेळी सोनाळा येथील आपत्कालीन कार्यकर्ते सागर पाटील, अमोल सुरसे, प्रशिक इंगळे, तुषार पगारे, प्रशांत पाटील, तेजस पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेंढपाळ बांधवांसह मेंढ्यांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

दीडशे ते दोनशे मेंढ्यांचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले. दरम्यान, या मेंढपाळांचा सोमवारी (ता.१) सायंकाळपासून ते मंगळवारी सायंकाळपर्यंत तब्बल २४ तासांत त्यांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, यात त्यांच्या घरातील सर्व खाण्यापिण्याच्या साहित्यासह संसारोपयोगी वस्तू या सर्व वाहून गेल्या.

त्यामुळे आज त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असून, पहूर तसेच सोनाळा परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करून जेवणाची व्यवस्था केली. यात प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, गणेश पांढरे, सरपंचपती रामेश्वर पाटील, पिंपळगाव गोलाईतचे सरपंच संदीप पाटील यांनी जेवणाची, नाश्त्याची आणि पाण्याची तातडीने व्यवस्था करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

Shepherd sisters wailing as their sheep died in the hailstorm.
Jalgaon GMC : जीएमसीत नवजात बालकांची अदलाबदल; अन्‌ उडाला गोंधळ

मेंढपाळांना तत्काळ आर्थिक मदत : मंत्री महाजन

घटनास्थळी सोनाळा येथील तलाठी धीरज जैन, पहूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयलाल राठोड जळगाव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सदाशिव शिसोदे, तहसीलदार अरुण शेवाळे यांनी तातडीने मेंढ्यांचे विच्छेदन करून पंचनामा केला.

घटनास्थळी गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अमित मित्तल यांनी घटनास्थळाची पाहणी करून मेंढपाळ बांधवांची तसेच मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांची पाहणी करून आमदार महाजन यांनी सांगितले, की सर्व पंचनामे करून शासकीय स्तरावर गारपिटीच्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रतिमेंढी चार हजार रुपये अनुदान तत्काळ देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Shepherd sisters wailing as their sheep died in the hailstorm.
Unseasonal Rain Crop Damage : हातातोंडाशी आलेला घास हिरावला; गिरणा परिसरास ‘अवकाळी’चा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()