Jalgaon News : महामार्गावर डंपर उलटला; एक ठार

Dumper accident
Dumper accidentesakal
Updated on

पाळधी (जि. जळगाव) : जळगाव- औरंगाबाद महामार्गावर (Highway) सोमवारी (ता. १३) दुपारी एकच्या सुमारास भरधाव वेगाने जळगावकडे जाणारे रिकामे डंपर भवानी फाट्याजवळ उलटले. (dumper overturned on highway 1 killed 3 seriously injured in accident jalgaon news)

जळगावकडे भरधाव वेगाने जाणारे डंपर (एमएच १९, सीवाय ५९१५) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या केळीच्या वेफर्स दुकानाला टक्कर देऊन उलटले. तेथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका धनगर इसमाच्या दुचाकीचा (एमएच ४१, बीबी २७३५) चुराडा झाला व त्यांना देखील जबर मार लागल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

गाडीमधील वाहक परमेश्वर प्रकाश आधारे (वय २२) याचा दबून जागीच मृत्यू झाला. त्याच ठिकाणी केळी वेफर्सच्या दुकानात काम करणारी अश्विनी प्रल्हाद भोई (वय १८) ही सुद्धा गंभीर जखमी झाली आहे.

संतोष भोई हे सुनसगाव येथील रहिवासी असून, त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह हा केळी वेफर्सवर असून त्यांच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर गंभीर जखमी झालेली त्यांची मुलगी ही बारावीची विद्यार्थिनी असून, तिच्यावर हे संकट ओढवले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Dumper accident
Jalgaon News : अट्टल घरफोड्याकडून 2 दुचाकी जप्त; कारागृहातून अटक करून गुन्हा उघड

पहूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जेसीबीच्या साह्याने पलटी झालेल्या डंपरला बाजूला केले व गाडीखाली दबलेल्या वाहकाला बाहेर काढण्यात आले तर चालक गंभीर जखमी झाला आहे. पहूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चौधरी तपास करीत आहेत.

जळगावहून दररोज अनेक रेतीचे डंपर ग्रामीण भागात रेती वाहतूक करण्यासाठी येत असतात त्यांचा वेग हा अमर्यादित असतो त्यावर नियंत्रण नसते त्यामुळे रस्त्याच्या कडेला हातावर पोट असलेल्यांचा नाहक बळी जात असून यासारख्या अनेक घटना घडत आहे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे

Dumper accident
Jalgaon Crime News : भुसावळला पिस्तूल लावून मागितली खंडणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.