पारोळा : तालुक्यातील बोदर्डे शिवारातील एका गोदामातून काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशनच्या तांदळासह लाखो रुपयांचे धान्य साठवून ठेवले होते. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पथकासह छापा टाकून हा लाखो रुपयांचा रेशनचा माल जप्त केला आहे.
येथील अमळनेर रस्त्यालगत गट क्रमांक ३५ /१ ‘ब’ मधील एका खासगी गोदामात रेशनचा माल अवैधरीत्या साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती.
त्यावरून जिल्हाधिकारी डॉ. अमीन मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार अनिल गवांदे, पुरवठा अधिकारी, व्ही. व्ही. गिरासे, नायब तहसीलदार आर. व्ही. महाडिक यांच्या उपस्थितीत लाखो रुपयांचा रेशनचा माल जप्त करण्यात आला. (During raid of Collector ration grain stocks worth lakhs was seized jalgaon news)
त्यात शेकडो पोते जप्त करण्यात आले बोदर्डे शिवारातील संशयित किरण पंजू वाणी यांच्या एका बंद गोदामात शनिवारी (ता. २४) दुपारी दोनला अचानक छापा टाकत रेशनचा अवैध माल मोठ्या प्रमाणात जप्त केला. त्यात ज्वारी, बाजरी, तांदूळ व गहू आदी मालाची मोजणी रात्री उशिरापर्यंत करत होते.
या बाबत प्रत्यक्ष किती माल जप्त झाला, याची माहिती रात्री उशिरा जाईल, असे तहसीलदार अनिल गवांदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सदर संशयित किरण पुंजू वाणी यांच्यावर या पूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. या बाबत स्वतः जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांनी टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.