अमळनेर (जि. नाशिक) : राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचनेनुसार अर्जित रजेचे रोखीकरण (Earned leave cashing) होणार आहे. अर्जित रजा देय असलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचनेतील वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम किंवा एका ठोक रकमेत रोखीने प्रदान करण्यात यावी, असे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे (Department of School Education and Sports) उपसचिव समीर सावंत यांनी दिले आहेत. (Earned leave for all teachers and non-teaching staff in the state Jalgaon Education News)
वित्त विभागाने यापूर्वीच अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची २४० दिवसांची मर्यादा ३०० दिवसांपर्यंत वाढविली आहे. राज्यातील खासगी मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ही मर्यादा लागू करण्यात आली आहे. राज्यातील खासगी मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १ जानेवारी २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे. यानंतर वित्त विभाग, शासन निर्णय २४ मे २०१९ अन्वये १ जानेवारी २०१६ ला किंवा त्यानंतर सेवानिवृत्त अथवा निधन झालेल्या तसेच निवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या रोखीकरणाबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
त्या आधारे राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना अर्जित रजा देय आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१६ रोजी किंवा त्यानंतर निवृत्त किंवा शासन सेवेत असताना निधन झालेल्या तसेच होणाऱ्या खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना अर्जित रजा देय आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाच्या परिगणनेसाठी ‘वेतन’ या संज्ञेचा अर्थ मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार राहील. अर्जित रजा देय असलेल्या कर्मचाऱ्यांबाबतीत सुधारित वेतन संरचनेतील वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम, एका ठोक रकमेत रोखीने प्रदान करण्यात येणार आहे.
फरकाची रक्कम रोखीने
जर संबंधित कर्मचारी १ जानेवारी २०१६ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत सुधारित वेतन संरचनेतील वेतनाच्या आधारे शिल्लक अर्जित रजेच्या रोख सममूल्याची रक्कम यापूर्वी अदा केलेली असल्यास त्यांना या शासन निर्णयाच्या अनुषंगाने फरकाची रक्कम ठोक रकमेद्वारे रोखीने प्रदान करण्यात यावी, असेही सुचविले आहे. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या ६ एप्रिल २०२२ च्या सहमतीने निर्गमित करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.