Teachers Credit Fund Election : पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक पतपेढीची निवडणूक रंगणार

District East Division Secondary Teachers, Non-Teaching Staff Credit Fund Election Candidates and Supporters of Paritarvan Panel
District East Division Secondary Teachers, Non-Teaching Staff Credit Fund Election Candidates and Supporters of Paritarvan Panelesakal
Updated on

Teachers Credit Fund Election : जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे असताना, सहकार पॅनलविरोधात आता परिवर्तन पॅनलने आव्हान उभे केल्याचे दिसत आहे.

भुसावळच्या जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, या निवडणुकीसाठी २१ मेस मतदान होणार आहे. (East Division Secondary Teachers Credit Fund Election jalgaon news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

District East Division Secondary Teachers, Non-Teaching Staff Credit Fund Election Candidates and Supporters of Paritarvan Panel
Tree Plantation : नाशिकच्या ‘देवराई’त 8 वर्षात जैवविविधता! 11 हजार रोप लावली

ही निवडणूक सुरवातीला बिनविरोध होण्याची चिन्हे होती. मात्र, उमेदवारांबाबत एकमत न झाल्याने सहकार पॅनलविरोधात परिवर्तन पॅनलने आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा रविवारी (ता. १४) प्रारंभ झाला.

उमेदवारांनी जळगावात बसस्थानकासमोरील चिमुकल्या राम मंदिरात नारळ वाढवून, श्रीरामाचे दर्शन घेत प्रचार सुरू केला. पॅनलप्रमुख शैलेंद्र ऊर्फ छोटू खडके, आर. के. पाटील, श्री. भटकर, श्री. धनगर, नारायण वाघ, सुरेश कोल्हे, गजानन निळे, तुषार बोरसे व परिवर्तन पॅनलचे समर्थक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते,

तसेच उमेदवार सुरेश सीताराम अहिरे, गोकुळ गणपत राजपूत, विनोद दिलीप महेश्री, सुनीता मिलिंद खडके, गिरीश शिवाजी नेमाडे, नितीन सुधाकर भालेराव, तुळशीराम तोताराम सोनवणे आदी उपस्थित होते. सर्व उमेदवार व परितर्वन पॅनल समर्थकांनी या वेळी विजयाचा निर्धार व्यक्त केला.

District East Division Secondary Teachers, Non-Teaching Staff Credit Fund Election Candidates and Supporters of Paritarvan Panel
Nashik News : पाळीव श्वानांवरून जॉगिंग ट्रॅकवर वाद! ज्येष्ठ नागरिकांची पोलिसांत तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.