Jalgaon Raid News : ईश्‍वरलाल जैन यांच्यासह मनीष यांना ‘ईडी’चे समन्स; दागिन्यांचा साठा ‘ताब्यात’

This was situation outside showroom of Rajmal Lakhichand Jewelers after ED raids it for inspection
This was situation outside showroom of Rajmal Lakhichand Jewelers after ED raids it for inspectionesakal
Updated on

Jalgaon Raid News : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कोट्यवधींच्या कर्ज प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात, ‘ईडी’ने सलग दोन दिवस राजमल लखीचंद ज्वेलर्स व अन्य आस्थापनांवर छापे टाकत तपासणी केल्यावर संचालक तथा माजी खासदार ईश्‍वरलाल जैन व त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांना समन्स बजावले आहे.

ईश्‍वरलाल जैन यांनी या वृत्तास दुजोरा दिला. (ED summons Manish along with Ishwarlal Jain of rl lakhichand jalgaon raid news)

‘ईडी’च्या या दोन दिवसांच्या छापेमारीत पथकाने आर. एल. ज्वेलर्समधील सर्व दागिन्यांचा साठा तसेच जवळपास ९० लाखांची रोकड ‘ताब्यात’ (सिज) घेतल्याचे सांगितले जात आहे. जैन पिता-पुत्रांनी या कारवाईविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरविले आहे.

काय आहे प्रकरण?

राजमल लखीचंद ज्वेलर्सने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून काही वर्षांपूर्वी वेगवेगळ्या टप्प्यांत सुमारे ५०० कोटींहून अधिक कर्ज घेतले होते. चार टक्के व्याजाने घेतलेल्या या कर्जाला बँकेने वसूल करताना नियमबाह्यपणे व्याजदर वाढवून, अतिरिक्त कर लावून थकबाकीची रक्कम वाढवून दिल्याचा दावा ईश्‍वरलाल जैन यांच्याकडून केला जात आहे.

त्यासंदर्भात उच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. या कर्ज प्रकरणात आर. एल.च्या संचालकांनी नियमबाह्यपणे सेटलमेंट केल्याचा आरोप आहे.

सीबीआयकडून ‘एफआयआर’

या प्रकरणात ‘एसबीआय’ने सीबीआयकडे तक्रार केल्यावर सीबीआयने ईश्‍वरलाल व मनीष जैन यांच्यासह अमरिश जैन यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल केली आहे. ती रद्दबातल करण्यासंदर्भात जैन पिता-पुत्रांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

This was situation outside showroom of Rajmal Lakhichand Jewelers after ED raids it for inspection
Jalgaon Raid News : वाहनांच्या ताफ्यासह 40 अधिकाऱ्यांचा फौजफाटा; समन्स, वॉरंटसह सर्व तयारीची सज्जता

‘ईडी’कडून तपासणी

‘ईडी’ने गुरुवार (ता. १७)पासून राजमल लखीचंद ज्वेलर्ससह मानराज मोटर्स, नेक्सा अशा तिन्ही शोरूमवर छापेमारी करीत तपासणी सुरू केली आहे. शुक्रवारी (ता. १८) सलग दुसऱ्या दिवशी ‘ईडी’च्या पथकांनी या तिन्ही आस्थापनांवर आपली तपासणी व चौकशी सुरूच ठेवली.

या तपासणीत आवश्‍यक कागदपत्रे, नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्वेलर्समधील दागिन्यांसह अन्य साठा तसेच दुकानातील ९० लाखांची रोकड ‘ताब्यात’ घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जैन पिता-पुत्रांना समन्स

‘ईडी’ने एकाचवेळी सर्व आस्थापना, निवासस्थानांवर छापेमारी करीत तपासणी सुरू केल्याने जळगावातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे ही चौकशी व संबंधितांचे जाबजबाब नोंदविले जात असताना ‘ईडी’ने ईश्‍वरलाल जैन, मनीष जैन यांना समन्स बजावले असून, चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात सांगितले आहे.

This was situation outside showroom of Rajmal Lakhichand Jewelers after ED raids it for inspection
Bihar Crime News : बिहारमध्ये पत्रकाराची गोळ्या घालून हत्या; मुख्यमंत्री नितीशकुमारांचे चौकशीचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.