Deepak Kesarkar : आर्थिक सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करणार : शिक्षणमंत्री केसरकर

Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal
Updated on

Deepak Kesarkar : केंद्र सरकारकडून राज्य सरकार विशेष आर्थिक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्र दीपक केसरकर यांनी दिले.

नाशिक विभागातील खासगी शिक्षण संस्थाचालक व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा बैठकीत ते बोलत होते. (Education Minister Kesarkar assured that will try to get financial support jalgaon news)

महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील, नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सचिव ॲड. नितीन ठाकरे, गोखले एज्युकेशनचे प्रा. राम कुलकर्णी, भूषण कर्डिले, मुख्याध्यापक संघाचे एच. बी. देशमुख, सेंटर उर्दू मिलट्रीरी संस्थेचे हेमंत देशपांडे, जळगाव जिल्ह्यातील प्रतिनिधीसह जुक्टो संघटनेचे अध्यक्ष संजय शिंदे, नाशिक विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, पंढरीनाथ मोरे व संस्थाचालक उपस्थित होते.

संस्थाचालकांनी थकीत वेतनेतर अनुदान तत्काळ उपलब्ध करून द्यावे. संस्थाचालकांचे अधिकार अबाधित ठेवावेत. जुन्या शाळेच्या इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar: मी शिर्डीत प्रार्थना केली अन्‌ कोल्‍हापूरची पूरस्थिती टळली! केसरकर यांचा दावा

शिक्षक भरती तत्काळ सुरू करावी. शासनाच्या धोरणामुळे अनुदानित शाळा व महाविद्यालयांच्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तांनी खासगी शाळा व संस्थांना महापालिका करातून सूट दिली आहे. हेच धोरण संपूर्ण राज्यात लागू व्हावे. नगरपालिका, महारपालिका व ग्रामपंचायत करातून सूट देण्यात यावी. कोठारी आयोगाच्या धोरणानुसार राज्याच्या अर्थसंकल्पात एकूण खर्चाच्या तरतूद वाढविण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी संस्थाचालकांनी शिक्षणमंत्र्याकडे केली.

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar News : वैज्ञानिक दृष्टिकोनाशी ‘ते’ पूर्णपणे विसंगत; महाराष्ट्र अंनिसची शिक्षणमंत्री केसरकरांवर टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.