Eknath Khadse News : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीमुळे रखडली पीकविमा रक्कम; एकनाथ खडसेंचा आरोप

Eknath Khadse
Eknath Khadseesakal
Updated on

Eknath Khadse News : केळी पीकविम्यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्टींग ऑपरेशन केले, शासनस्तरावर प्रधान सचिव कृषी विभाग यांच्याकडे केलेल्या तक्रारीमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केळी पीकविमा रक्कम रखडली असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी आज येथे केला. मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केल्याप्रमाणे बारा टक्के व्याजासह शेतकऱ्यांना रक्कम कधी मिळणार, असा प्रश्नही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुक्ताईनगर येथे शुक्रवारी (ता.२२) पत्रकार परिषद घेण्यात आली.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

या वेळी राष्ट्रवादी किसान सेलचे सोपान बाबूराव पाटील, बोदवडचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबा पाटील, रमेश (गोटू) महाजन, दिनकर महाजन, योगेश कोलते उपस्थित होते.

खडसे म्हणाले, जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या संदर्भात असंतोष असून, एक ते ३१ ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांना विम्याची रक्कम खात्यावर मिळणे आवश्यक असताना एक महिन्याच्या वर वेळ निघून गेली तरी अद्यापही पैसे मिळालेले नाही.

दरम्यान, नियमानुसार विमा कंपनीने रक्कम दिली नाही तर बारा टक्के व्याज त्यावर लावून दिले जाते. त्यामुळे १२ टक्के व्याजासह पैसे कधी मिळणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ७६ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना विमा देण्याची घोषणा केली.

Eknath Khadse
Maratha Reservation Eknath Khadse : शासनाला मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चिघळवायचाय : एकनाथ खडसे

मंत्री गिरीश महाजन यांनी ७६ हजार हेक्टर शेतजमिनीवरील शेतकऱ्यांना १२ टक्के व्याजासह विमा रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना विमा का मिळाला नाही? असा प्रतिप्रश्न खडसे यांनी याप्रसंगी केला. सीएमव्ही या रोगाच्या संदर्भात तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षांपूर्वी मुक्ताईनगर येथे झालेल्या जाहीर सभेच्या दरम्यान घोषित केले होते.

मात्र अद्यापही शेतकऱ्यांना सीएमई रोगाचे कोणत्याही प्रकारचे नुकसानी नुकसानीचे पंचनामे होऊन देखील अद्यापही कोणताही लाभ केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा टोला खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लावला. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना लवकर न मिळाल्यास राष्ट्रवादीने जाहीर केल्याप्रमाणे आंदोलन करण्याचा इशारा देखील खडसे यांनी याप्रसंगी दिला.

Eknath Khadse
Eknath Khadse News : रावेर लोकसभा लढविण्याबाबत एकनाथ खडसेंचे मोठे विधान; या आघाडीतर्फे निवडणूक लढविणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.