Jalgaon : विधान परिषदेसाठी खडसेंची उमेदवारी निश्चित?

Eknath Khadse
Eknath Khadseesakal
Updated on

जळगाव : भाजपत्याग (BJP) करून राष्ट्र्वादीत (NCP) प्रवेश केल्यानंतरही दीड वर्षापासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एकनाथ खडसेंची (Eknath Khadse) विधान परिषदेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांचेही नाव राष्ट्रवादीकडून निश्चित आहे. (eknath Khadse candidature for Legislative Council confirmed or not Jalgaon Political News)

विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी ‘मविआ’तील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रत्येकी दोन तर भाजपचे ४ सदस्य सहज निवडून जातील. त्यासाठी प्रत्येक पक्षातील नेते आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत.

खडसेंना संधी

राष्ट्र्वादीत प्रवेश केल्यानंतरही खडसे राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होते. या आधीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांचे नाव देण्यात आले होते. मात्र, राज्यपालांनी ही यादी अद्याप मंजूर केलेली नाही. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीसाठी खडसेंचे नाव निश्चित झाल्याची माहिती राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी 'सकाळ'ला दिली.

Eknath Khadse
Nashik : हत्यारांसह तडीपार संशयितास अटक

निवडणुकीत चुरस

राज्यसभेच्या ६ जागांसाठी राज्यात रस्सीखेच सुरू असताना आणि ही निवडणूक बिनविरोध झालेली नसताना, विधान परिषद निवडणूकही बिनविरोध होणार नाही, असे मानले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल.

Eknath Khadse
सेनेची सुरक्षित मते पवारांना उर्वरित राऊतांना : आमदार नीतेश राणे

खडसेंना न्याय मिळणार

भाजपच्या सत्ताकाळात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर खडसेंसह त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. राष्ट्रवादीतही खडसे दुर्लक्षित झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांत आहे. त्यामुळे विधान परिषदेवर त्यांची निवड झाल्यास खडसेंना न्याय मिळेल, असे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.