Eknath Khadse: मेहबूबा मुफ्तींसोबत सरकार करताना भाजपने सनातन धर्म खुंटीला टांगला का?

Eknath Khadse News
Eknath Khadse Newsesakal
Updated on

Eknath Khadse: काश्‍मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केले होते.

त्या वेळी भाजपने सनातन धर्म खुंटीला टांगून ठेवला होता का? असा प्रतिप्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना गुरुवारी (ता. ३०) येथे केला. ड्रग्जमाफिया ललित पाटीलचे नाशिक ‘कनेक्शन’ उघड करावे, अशी मागणी त्यांनी केली. (Eknath Khadse question bawankule about BJP in government with Mehbooba Mufti jalgaon news)

श्री. बावनकुळे हे जळगाव दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या ‘संपर्क ते समर्थन अभियान’चा समारोप करताना त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली होती. उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानाशी शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका जाहीर करावी. जर त्यांना त्यांची भूमिका मान्य नसेल, तर त्यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले होते.

त्यांना पत्रकार परिषदेत उत्तर देताना खडसे म्हणाले, की बावनकुळे यांनी आम्हाला प्रश्‍न विचारण्याऐवजी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना विचारावे. काश्‍मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर भाजपने सरकार स्थापन केले होते.

Eknath Khadse News
...म्हणून प्रमोद महाजनांनी 2004 मध्ये NCP-BJP युती होऊ दिली नाही; प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

मंत्री आणि नेत्यांचा समावेश

ड्रग्जमाफिया ललित पाटील याच्याबाबत खडसे म्हणाले, की ललित पाटील प्रकरणात सरकारमधील मंत्री व नेत्यांचा समावेश आहे.

त्याचे नाशिक व चाळीसगाव येथील ‘कनेक्शन’ उघड करावे. याठिकाणी तो कोणाच्या सोबत राहत होता, कोणाला भेटला हे सरकारने जाहीर करावे. मंत्र्यांचा संबंध असल्याशिवाय ससून रुग्णालयातून ललित पाटील फरारी होऊ शकत नाही. त्यात वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा सहभाग होता का, याची तपासणी करावी.

Eknath Khadse News
Devendra Fadnavis यांचा ‘संकटमोचक’ भिडला, Sharad Pawar यांच्या पठ्ठ्यानं खडसावलं |Eknath Khadse vs Girish Mahajan

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.