जळगाव : आपल्या मुलाच्या बाबतीत मंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत खालच्या पातळीवरचे वक्तव्य केले आहे, अशा शब्दांत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना प्रत्युत्तर दिले आहे. (Eknath Khadse reply to Girish Mahajan Jalgaon Political news)
श्री. महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याच्या तपासाची आता गरज असल्याचे विधान आज पत्रकार परिषदेत केले, त्याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, की गिरीश महाजन यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. माझ्या मुलाचा मृत्यू झाला त्या वेळी मी पंधरा किलोमीटर लांब होतो. घरामध्ये रक्षा खडसे व मुलगा दोघेच होते, अशा परिस्थितीत संशय घेणे म्हणजे महाजन यांची मनोवृत्ती किती खालच्या दर्जाची आहे, हे दिसून येत आहे.
मी त्यांच्या मुलाबांळाविषयी बोललो नाही, ते घराणेशाही विषयी बोलले, त्या वेळी मी तुमच्या घरामध्ये साधनाताई या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि नगराध्यक्ष पंधरा वर्षांपासून आहेत. दुसरं कुणी नाही का? तुम्हाला जर मुलगा असता आणि सून असती, तर कदाचित तुम्ही त्यांना राजकारणात आणले असते. मुलाला मी आयुष्यमान भव असे शुभार्शीवाद दिले असते, दुर्दैवाने गिरीशभाऊ यांना मुलगा नाही. असते तर त्यांनी राजकारणात आणले असते, असे मी म्हणालो. गिरीशभाऊ यांनी ‘मी आणखी काही बोलू शकतो’, असे म्हटले आहे, त्यांनी बोलले पाहिजे, लपविता कामा नये.
चाळीस वर्षांच्या राजकारणात मी कसा आहे, काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यातील राजकारणात तर जनतेने मला जवळून पाहिले आहे. माझे कुणाशी संबंध आहे, कुणाबरोबर मी राहिलेलो आहे, हे सर्व जळगाव जिल्ह्याला माहिती आहे. अगदी मला गिरीशभाऊंचेही माहिती आहे, त्यामुळे जनता पाहिलच फर्दापूरच्या रेस्ट हाउसमध्ये काय झाले? याच्या कथा आमच्या जिल्ह्यातील वृत्तपत्रात महिनाभर रंगल्या. सुरा, सुंदरी अशा काही हेडलाइन त्या काळात वर्तमानपत्रांत आल्या होत्या, त्या काळातील मी साक्षीदार आहे.
कारण मी त्यावेळी फर्दापूरला गेलो होतो, अशा गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत, अशा अनेक गोष्टी माहितीही आहेत महाराष्ट्राच्या जनतेला; परंतु मला वेदना होतात, मुलाच्या आत्महत्येविषयी त्यांनी असे बोलणे म्हणजे त्यांची एकतर रक्षाताईवर संशयाची सुई असेल; या संदर्भात काय घडले हे विनाकारण संशयाची सुई निर्माण करण्याचा हेतू दिसतो आहे. गिरीशभाऊ देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहे, असे म्हटले जाते. केंद्रात मोदींचे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी याची सीबीआय चौकशी करावी आणि ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ करावे. परंतु कुणाच्या भावना दुखाविण्याचे काम करू नये. मी त्यांच्या भावना दुखावेल असे बोललोच नाही. केवळ मुलगा असता तर... असे म्हटले आहे. परंतु ते सत्तेचा माज आणि मस्तीतून असे वक्तव्य करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.