Maratha Reservation Eknath Khadse : शासनाला मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चिघळवायचाय : एकनाथ खडसे

Eknath Khadse
Eknath Khadse esakal
Updated on

Maratha Reservation Eknath Khadse : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन टाळटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. शासनाला हा प्रश्‍न चिघळवायचा असल्याचे दिसून येत आहे.

लोकांमध्ये संताप निर्माण होण्याअगोदर शासनाने केंद्र सरकारच्या माध्यमातून घटना दुरूस्ती करून हा प्रश्‍न तातडीने सोडवावा, असे मत राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. (eknath khadse statement about maratha reservation and government jalgaon news)

जळगाव येथे ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, कि सरकारने मराठा आरक्षण प्रश्‍नासाठी तातडीने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका शरद पवारांनीही मांडली आहे.

देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यांनी केंद्र सरकारला घटना दुरूस्ती करावयास भाग पाडावे. मराठा समाजाला १५ टक्क्यांचे अधिक आरक्षण तातडीने द्यावे. परंतु, सरकारच या प्रश्‍नाला तरंगत ठेवून जाती-जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

अपात्रतेची सुनावणी लवकर घ्यावी

शिवसेनेच्या चौदा आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत ते म्हणाले, कि विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीची कालमर्यादा निश्‍चीत करावी आणि त्या कालावधीतच निकाल द्यावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eknath Khadse
Maratha Reservation : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा निर्णय; तीन अधिकारीही निलंबित

मग त्यावर अपील करायवयाचे असल्यास ते अपील करू शकतात. परंतु, केवळ सुनावणीला विलंब करण्यासाठी तारीख पे तारीख करण्यात येत असेल, तर त्याला अर्थ राहणार नाही.

मग शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची सुनावणी, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची सुनावणी असे केल्यास त्याला विलंब लागून विधानसभेच्या निवडणूकाही होवून जातील. त्यानंतर मात्र सुनावणीला कोणताही अर्थ राहणार नाही.

भाजपला आता प्रोटोकॉल आठवला?

जळगावात सरदार वल्लभभाई पटेल व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत भाजपने राजशिष्टाचाराचा (प्रोटोकॉल) मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर श्री. खडसे म्हणाले, कि जिल्ह्यात रस्त्याचे, तसेच इतर उद्‌घाटन करताना भाजपला कधीही आमदारांना, खासदारांना बोलवावे असे वाटत नाही.

कोणीही मंत्री येतो आणि उद्‌घाटन करतो. त्यावेळी त्यांना हा मुद्दा का आठवत नाही? सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आनावरणात पूर्णपणे राजशिष्टाचारा पाळला गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Khadse
Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीत मनसेची काहीच भूमिका नाही; राज ठाकरेंनी घेतली होती जरांगेंची भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.