Eknath Khadse :.... तर शहराला देवच वाचवेल : एकनाथ खडसे

Eknath Khadse News
Eknath Khadse Newsesakal
Updated on

जळगाव : इच्छादेवी चौक ते डिमार्ट रस्त्याचे काम निकृष्ट (Inferior) दर्जाचे होत असल्याने त्यात दुरुस्ती करून ते सुरू करा, असे आपण सांगितले; परंतु रस्त्याची पाहणी न करताच आमदार सुरेश भोळे यांनी मक्तेदराची बाजू घेऊन वक्तव्य केले आहे. (eknath khadse statement about People representatives in ruling group)

काही विशिष्ट ठेकेदारांसाठी सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधी काम करीत असतील, तर या शहराला आता परमेश्‍वरच वाचवू शकेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली.

आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी (ता. १०) इच्छादेवी चौक ते डिमार्ट रस्त्याची पाहणी केली होती. त्याठिकाणी निविदेप्रमाणे मक्तेदार काम करीत नसल्यामुळे तसेच साडेदहा मीटरचा रस्ता असतानाही अतिक्रमण न काढता आहे त्या पद्धतीने कमी लांबीच्या रस्त्याचे काम करण्यात येत होते.

त्याला खडसे यांनी हरकत घेऊन अतिक्रमण काढल्यानंतर काम करा, तोपर्यंत काम थांबवा, असे सांगितले होते. त्याला भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी उत्तर देत या रस्त्याचे काम थांबविणे म्हणजे जनतेच्या जिवाशी खेळणे, असे म्हणत खडसे यांना विरोध केला होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Eknath Khadse News
BHR Case : SIT कडून संशयितांच्या पुराव्यांचे संकलन

आमदार भोळे यांच्या विधानाला उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे, की आमदार सुरेश भोळे यांनी त्या कामाला भेट दिली नाही, जागेची पाहणी केली नाही. फक्त मक्तेदाराला वाचविण्यासाठी काम सुरू ठेवा, असे विधान करणे चुकीचे आहे.

भोळे यांनी आपण केलेले विधान परत वाचावे. जर त्याठिकाणी साडेदहा फुटांचा रस्ता आहे आणि काम केवळ साडेसात फुटाचेच होत असेल तर हे काम निकृष्ट नाही काय? आपण केवळ कामाचा दर्जा सुधारून काम सुरू ठेवावे, असेच म्हटले आहे.

Eknath Khadse News
Racer Bikers : मेहरुण ट्रॅकवर रेसर बाईर्क्सचा उच्छाद

कारण या रस्त्याचा वापर वर्षानुवर्षे होणार आहे आणि दर्जाहीन काम झाल्यास ते लवकर खराब होतील व नागरिकांनाच त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आपली मागणी योग्य असतानाही आमदारांनी असे विधान का करावे, हा प्रश्‍न आहे. केवळ मक्तेदाराच्या हिताची ते बाजू घेत असतील तर ते चुकीचे आहे.

निकृष्ट दर्जाचे काम होत असताना मक्तेदारांची बाजू घेऊन सत्ताधारी गटाचे लोकप्रतिनिधी बोलत असतील, तर ही गंभीर बाब आहे. त्या शहरातील रस्त्याच्या कामांची काय स्थिती असेल हे आता दिसून येत आहे. या परिस्थितीत जळगाव शहराला आता फक्त परमेश्‍वरच वाचवू शकतो.

Eknath Khadse News
Yuvaranga Festival : महाकाय भटारखाना ठरतोय लक्षवेधी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.