Eknath Khadse News : निकृष्ट पोषण आहाराद्वारे मुलांच्या जिवाशी खेळ : एकनाथ खडसे

Eknath Khadse
Eknath Khadse esakal
Updated on

Eknath Khadse News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह शासकीय, खासगी, तसेच अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये पुरविल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट असून, त्यात कुजलेले अन्न-धान्य, किडे व पीठ पडलेले धान्य वापरले जात आहे.

या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. (Eknath Khadse statement about Playing with children lives through poor nutrition jalgaon news)

श्री. खडसे यांनी यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री धर्मराव आत्राम यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यभरात शालेय पोषण आहारांतर्गत विविध शाळांमधील पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक (कॅलरी) आणि १२ ग्रॅम प्रोटीनयुक्त दुपारचे माध्यान्ह भोजन, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रोटीनयुक्त आहार देण्याची योजना आहे.

यात तांदूळ, चना, मसूर डाळ, वाटाणे, तुरडाळ आदी अन्नधान्य साहित्य कंत्राटदाराद्वारे पुरविण्यात येते. मात्र, गेल्या काही काळापासून या धान्यात कीड, अळ्या आढळून येत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eknath Khadse
Eknath Khadse News: रोहित पवार यांची 2 पासून संवाद यात्रा : एकनाथ खडसे

काही भागात निकृष्ट दर्जाचे धान्य, सडलेले व कुजलेले पदार्थ, तसेच पीठ पडलेले वाटाणे आढळून आले. मुक्ताईनगर मतदारसंघातील काही शाळांमध्ये स्वत: पाहणी करुन तपासणी केली असता, असे प्रकार समोर आले आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश भागातून अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत. जळगाव व धुळे जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये हे प्रकार आढळून आले असून, त्या ठिकाणच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

अशाप्रकारे पोषण आहाराचाच दर्जा निकृष्ट असताना विद्यार्थ्यांचे पोषण होण्याऐवजी त्यांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करुन संबंधित पुरवठादारावर कारवाई करावी. त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी खडसेंनी केली आहे.

Eknath Khadse
Eknath Khadse : अजितदादांसारख्या ज्युनिअर उपमुख्यमंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी फडणवीसांची सही लागते ; खडसेंचा टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.