Eknath Khadse News : रावेर लोकसभा लढविण्याबाबत एकनाथ खडसेंचे मोठे विधान; या आघाडीतर्फे निवडणूक लढविणार

Eknath Khadse
Eknath Khadseesakal
Updated on

Eknath Khadse News : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभेसाठी जागा वाटपात रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्याचा निर्णय झाल्यास ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून आपण रावेर निवडणूक लढविण्यास तयार आहोत. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी (ता. १३) माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची जळगाव येथे सागर पार्क मैदानावर नुकतीच जाहीर सभा झाली. त्या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना, एकनाथ खडसे यांनी लोकसभेचे धनुष्यबाण पेलावे असे अवाहन केले होते. (Eknath Khadse statement about Raver Lok Sabha election by India alliance jalgaon news)

त्यानंतर रावेर लोकसभा मतदार संघात श्री. खडसे उमेदवारी करतील असे बोलले जात होते. तसेच, या मतदार संघात त्यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर सासरा विरूद्ध सून अशी लढत होईल, अशीही चर्चा सुरू झाली होती. या संदर्भात बुधवारी खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना थेट खुलासाच केला.

ते म्हणाले, की पक्षाने आपल्याला जबाबदारी दिल्यास ‘इंडिया’आघाडीच्या माध्यमातून आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार आहोत. रावेर लोकसभा मतदार संघाची निवडणूक कॉंग्रेसने दहा वेळा लढली आहे. त्यांना केवळ एकदाच विजय मिळाला. तोही फक्त तेरा महिन्यांचाच कालावधी त्यांना मिळाला होता.

मात्र नऊ वेळा या ठिकाणी कॉंग्रेसचा पराभव झालेला आहे. त्यामुळे आता ही जागा ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे घ्यावे, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत कॉंग्रेसने हा मतदार संघ राष्ट्रवादीला दिला तर आपण लढविण्यास तयार आहोत. मात्र हा सर्व निर्णय ‘इंडिया’ आघाडीचा एकत्रीत होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eknath Khadse
Eknath Khadse News : निकृष्ट पोषण आहाराद्वारे मुलांच्या जिवाशी खेळ : एकनाथ खडसे

ग्वॉल्हेरचे दिले उदाहरण

खडसे यांच्या घरातच दोन पक्ष आहेत. त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपच्या खासदार आहेत, तर खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. त्याबाबत ते म्हणाले, कि देशात अशी कितीतरी उदाहरणे आहेत. ग्वाल्हेरमध्ये तर माधवराव शिंदे यांच्या मातोश्री विजयाराजे शिंदे भाजपमध्ये, तर माधवराव शिंदे कॉंग्रेसमध्ये होते.

त्यांनी एकमेकाविरूद्ध निवडणूकाही लढविल्या आहेत. त्यामुळे आमच्या घरात दोन पक्ष असले, तरी रक्षा खडसे या भाजपचे काम इमाने इतबारे करीत आहेत. मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करीत आहे.

त्यामुळे आमच्यात कधी वाद झाले नाही आणि तसे होण्याचे कारणही नाही. रक्षा खडसे यांना त्यांच्या पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ती त्या पार पाडतात. मला माझ्या पक्षाने जबाबदारी दिली ती मी पार पाडतो. त्यामुळे वाद होण्याचा कोणताही संबधच नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Eknath Khadse
Eknath Khadse News : तांबापूऱ्याला ७/१२ उतारा लावण्यासाठी प्रयत्न करू : आमदार खडसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.