Eknath Khadse : ‘एसआयटी’ चौकशीत दबावामुळेच आमची नावे : एकनाथ खडसे

Eknath Khadse News
Eknath Khadse Newsesakal
Updated on

Eknath Khadse : मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज उत्खनन प्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस आल्यावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या संबंधी चौकशीत ‘एसआयटी’ अहवालात खडसे परिवारातील कुणाचेच नाव नव्हते, मात्र राजकीय दबावामुळे अगदी ऐनवेळी आपली नावे घालण्यात आल्याचा आरोप केला.(Eknath Khadse statement of Our names are due to pressure in SIT investigation jalgaon news )

अशा प्रकारच्या गौण खनिज उत्खननाच्या प्रक्रियेत ज्या खात्याला ते हवे आहे व ज्या मक्तेदाराने त्याचा उपसा केला आहे, त्याला नोटीस बजावता येते. मात्र, अशी प्रक्रिया न राबविता, आमचे कोणतेही म्हणणे न ऐकता ‘एसआयटी’ने एकतर्फी नोटीस बजावल्याचा दावाही खडसेंनी केला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी मुरूम उत्खननासाठी संबंधित रस्तेकामाच्या मक्तेदारास कंत्राट देण्यात आले होते. कामाला लागणाऱ्या मुरमापेक्षा अतिरिक्त मुरूम व गौण खनिज उत्खनन झाल्याचा दावा करीत महसूल विभागाने एकूण रकमेच्या पाचपटीने १३७ कोटींच्या दंडाची नोटीस एकनाथ खडसेंसह खासदार रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसेंना बजावली आहे. या प्रकरणावर गिरीश महाजन यांनी खडसेंनी त्यात चोरी केली नाही, असे सिद्ध करावे, असे आव्हान दिले होते.

आमचा काय संबंध?

माध्यमांशी रविवारी बोलताना खडसे म्हणाले, की हे सर्व प्रकार राजकीय द्वेषाने सुरू आहेत. गौण खनिज उत्खननाशी आमचा कोणताही संबंध नाही. राष्ट्रीय महामार्गाला गौण खनिज हवे होते, त्यांनी निविदा काढली, मक्तेदाराने ते पुरविले. ते किती पुरवले, कसे पुरवले, याचा हिशेब मक्तेदाराने व वेळ पडली तर महामार्ग प्राधिकरणाने द्यायचा आहे.

Eknath Khadse News
Eknath Khadse : भोसरी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसेंना जामीन मंजूर

त्याबाबत शेतजमिनीचे मालक म्हणून आम्हाला नोटीस देण्याचे काय कारण? या प्रकरणात जी ‘एसआयटी’ नेमली, त्या समितीने आमचे म्हणणे न ऐकता एकतर्फी निर्णय दिला. चौकशीत आमचे कुठेही नाव नव्हते. मात्र, खडसे नावाची ॲलर्जी असलेल्यांनी राजकीय दबाव वापरून ऐनवेळी आमची नावे टाकली, असा आरोपही त्यांनी केला. असे असले तरी आपण चौकशीला घाबरत नाही, या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागू, असेही ते म्हणाले.

रक्षाताई प्रामाणिकपणे पक्षाचे काम करताहेत

या प्रकरणात रक्षा खडसेंनाही जाणीवपूर्वक नोटीस काढण्यात आली. मी जरी ‘राष्ट्रवादी’त असलो, तरी मी माझ्या पक्षाचे व रक्षाताई त्यांच्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे करताहेत. खासदार म्हणून दहा वर्षांत त्यांनी मतदारसंघात चांगला संपर्कही निर्माण केला आहे. मात्र, खडसे नावामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप खडसेंनी केला.

Eknath Khadse News
Eknath Khadse : ‘केळी विम्याचे पैसे देऊ नका’, असा उल्लेख पत्रात असेल तर राजीनामा देऊ : एकनाथ खडसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.