Eknath Khadse : कापूस भाव, पाणीटंचाईवर निर्णय घ्या : एकनाथ खडसे

eknath khadse
eknath khadseesakal
Updated on

Eknath Khadse : कापसाला भाव मिळत नसल्यामुळे अद्याप शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ‘शासन आपल्या दारी’ योजना राबवीत आहेत.

मात्र, त्याचा फायदा जनतेला होत नाही. मंगळवार (ता. २७)पर्यंत या समस्यांबाबत निर्णय न झाल्यास जळगाव येथे मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी (ता. २३) दिला. (Eknath Khadse warning to shinde fadnavis govt to Take decision on cotton price water scarcity jalgaon news)

जळगाव येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभय्या पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगला पाटील, राष्ट्रवादी युवक आघाडीचे रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

आमदार खडसे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्यात चौथ्यांदा येत आहेत. बंडात त्यांना जिल्ह्यातील पाच आमदारांनी खोक्यांमुळे, की त्यांच्या प्रेमामुळे साथ दिली, हे मी सांगू शकत नाही. ‘खोके’ हा शद्ब त्यांच्याच आमदारांनी सांगितला आहे. मात्र, चौथ्यांदा येऊनही जळगाव जिल्ह्यात कोणताही विकास झालेला दिसत नाही.

जिल्ह्यात अनेक प्रश्‍न आहेत. कापूस भावाचा गंभीर प्रश्‍न आहे. भाव नसल्यामुळे अद्यापही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. शासनाने कापसाला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, अशी आपली मागणी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

eknath khadse
Chandrashekhar Bawankule on Eknath Khadse: ‘पदं मिळाली , खोटं बोलू नका‘ बावनकुळेंनी एकनाथ खडसेंना खडसावले

जिल्ह्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्‍न आहे. जिल्ह्यात सध्या २७ टँकर सुरू आहेत. बोदवड तालुक्यात सर्वांत जास्त ४४ गावांना टंचाई आहे. पाण्यासाठी टँकरची मागणी होत आहे. मात्र, त्यांना टँकर दिले जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.

जलजीवन मिशनमध्ये गैरव्यवहार

जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना राबविली असून, त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही श्री. खडसे यांनी केला. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर न जाता गुगलच्या माध्यमातून मोजमाप केली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच लागलेले नाही. केवळ कागदावरच ही योजना दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अन्यथा काळे झेंडे दाखविणार

जिल्ह्यातील कापूस भाव व पाणीटंचाईचा गंभीर प्रश्‍न आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न तर अतिशय गंभीर आहे. उपमुख्यमंत्री कर्तव्यदक्ष समजले जातात. जळगाव जिल्ह्यात त्यांच्या दक्षतेचा कोणताही प्रभाव नसल्याचे दिसत आहे.

त्यांनी अवैध धंद्यावर कारवाई करून आपल्या कर्तव्यदक्षतेचा अनुभव द्यावा, असे आव्हानही श्री. खडसे यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी जळगावला येण्यापूर्वी कापूस भाव आणि पाणीटंचाईचा प्रश्‍न सोडवावा, अन्यथा त्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

eknath khadse
Jalgaon Eknath Khadse : पाणीटंचाईवरून खडसेंकडून अधिकारी धारेवर; आढावा बैठकीत शिंदे सरकारवर टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.