Eknath Shinde : राज्यात शिंदे गटाचा 'पहिला सरपंच'; 'या' ग्रामपंचायतीला मिळाला मान

शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय.
Eknath Shinde Gulabrao Patil
Eknath Shinde Gulabrao Patilesakal
Updated on
Summary

शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

जळगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेसोबत (Shiv Sena) बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटानं पाठिंबा दिला. याच आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी भाजपासोबत (BJP) मिळून राज्यात सरकार देखील स्थापन केलंय.

दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. त्यातच आता बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटासाठी एक दिलासादायक बातमी आहे. एका बाजूला शिवसैनिकांचा रोष सुरु असताना दुसरीकडं जळगाव जिल्ह्यानं एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिलाय.

Eknath Shinde Gulabrao Patil
Sanjay Raut : बंडखोर आमदारांची राजकीय तिरडी उठणारच; राऊतांचा कडक शब्दात इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर, राज्यात शिंदे गटाचा 'पहिला सरपंच' होण्याचा मान जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील कुसुंबा ग्रामपंचायतीला मिळालाय. कुसुंबा ग्रामपंचायत (Kusumba Gram Panchayat) माजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या नेतृत्वात झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे (Yamunabai Thackeray) या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. या पहिल्या निवडीमुळं शिंदे गटातील आमदारांचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()