Jalgaon News : चोपडा शेतकरी सहकारी संस्थेची फसवणूक; बंद खात्याचा धनादेश देत संचालकाने भरला उमेदवारी अर्ज

Chopra Farmers Cooperative Sugar Factory
Chopra Farmers Cooperative Sugar Factoryesakal
Updated on

चोपडा : येथील चोपडा शेतकरी सहकारी संस्थेची निवडणूक सुरू असून, २१ जागांसाठी तब्बल १७१ अर्ज आले आहेत. निवडणुकीत एका विद्यमान संचालकाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखला मिळविण्यासाठी बंद खात्याचा धनादेश देत चोपडा साखर कारखान्याची दिशाभूल वजा फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

चोपडा साखर कारखान्याची निवडणूक सुरू असून, उमेदवारी अर्ज भरताना कोणतीही थकबाकी आपल्यावर नको ही सर्वसाधारण अट असते.

या अटीच्या फासातून सुटण्यासाठी चोसाकाचे मागील संचालक मंडळातील संचालक नीलेश दत्तात्रय पाटील (चहार्डी) यांनी चोसाका प्रशासनास बंद खात्याचा धनादेश देत आपल्या नावावरील थकबाकी भरली, असा दाखला मिळवत चोसाका निवडणुकीत पुन्हा उमेदवारी दाखल केली.(Election of Chopra Farmers Cooperative Society Fraud Nomination form filled by the giving the check Jalgaon News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Chopra Farmers Cooperative Sugar Factory
Jalgaon News : पाचोरा-जामनेरदरम्यान ‘नॅरो’चे रूपांतर होणार Broad Gaugeमध्ये! 50 किलोमीटरचा फेरा वाचणार

मात्र, चोसाका प्रशासनाने तो धनादेश वटवण्यासाठी टाकला असता, नीलेश पाटील यांनी दिलेला तो धनादेश बंद खात्याचा असल्याचे व तो न वटल्याचे निदर्शनास आले. त्यावरून चोसाकाचे कार्यकारी संचालक अकबर पिंजारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधकांना कळविले.

यासंदर्भात कार्यकारी संचालक पिंजारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला दुजोरा देत, चोसाकाची प्रथमदर्शनी फसवणूक झाली असल्याचे सांगितले, तसेच काही कायदेशीर बाबी तपासून १३८ ची नोटीस पाठविणार असल्याचे सांगितले.

"बंद खात्याचा धनादेश दिला होता. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तसे पत्र पाठवून संचालक थकबाकीदार आहेत, असे कळविले आहे. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. तत्पूर्वी ती रक्कम आरटीजीएस प्रक्रियेने शुक्रवारी (ता. १३) चोसाका खात्यात जमा केली आहे."

-अकबर पिंजारी, प्र. कार्यकारी संचालक

Chopra Farmers Cooperative Sugar Factory
Jalgaon News | रस्त्यांच्या दर्जाचे थर्ड पार्टी ऑडिट होणार : जिल्हाधिकारी मित्तल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.