Jalgaon : गटनेता निवड, नगरसेवकांचा फैसला महिनाभराने

jalgaon muncipal carporation
jalgaon muncipal carporationesakal
Updated on

जळगाव : महापालिकेचा गटनेता व नगरसेवक अपात्रतेबाबत नाशिक विभागीय आयुक्ताकडे सुरू असलेल्या सुनावणीचा अंतिम निकाल २७ सप्टेंबरला देण्यात येणार होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली असून पुढील चार आठवडे त्याबाबत निर्णय देवू नये असे आदेश दिले आहेत. (Election of group leader decision of corporators after month Order to Nashik Divisional Commissioner jalgaon news)

jalgaon muncipal carporation
Jalgaon : निलंबित निरीक्षक बकालेंच्या अटकपूर्वला विरोध

जळगाव महापालिकेत भाजपचे २७ नगरसेवक फुटल्यानंतर फुटीर गटाने आपणच भाजप असल्याचा दावा केला होता. त्यांनी आमच्या गटनेत्याचा आदेश मानावा असेही नमूद केले होते. मात्र फुटीर गटाच्या गटनेतेपदावर हरकत घेत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर आदेश दिला होता, त्यात म्हटले होते की, महापालिकेच्या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याबाबतच्या याचिकेवर नाशिक विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी सुरू आहे, त्यातच गटनेतेपदाची सुनावणी घेऊन निकाल द्यावा. दहा आठवड्यात निकाल देण्याबाबत अंतिम मुदतही दिली होती.

jalgaon muncipal carporation
Jalgaon : निलंबित निरीक्षक बकालेंच्या अटकपूर्वला विरोध

औरंगाबाद खंडपीठाच्या या निकालाच्या विरोधात महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आमची हरकत आहे, दहा आठवड्यात निकाल देण्याचा नाशिक विभागीय आयुक्तांना जो आदेश दिला आहे. तो रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.त्यावर न्यायालयाने आज निकाल दिला आहे.

त्यात म्हटले आहे, महापालिकेचा गटनेता निवड व नगरसेवक अपात्रतेची नाशिक विभागीय आयुक्तांकडे असलेली सुनावणीचा कोणताही अंतिम निकाल पुढील चार आठवडे देवू नये. याचिकाकर्ते महापौर व उपमहापौर यांच्यातर्फे ॲड. देवदत्त कामत यांनी काम पाहिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे महापालिकेच्या गटनेता निवड व नगरसेवक अपात्रतेबाबतचा नाशिक विभागीय आयुक्तांसमोर सुरू असलेल्या सुनावणीचा अंतिम निकाल २७ सप्टेंबरला होणार होता. तो आता चार आठवडे म्हणजे एक महिना पुढे ढकला आहे.

jalgaon muncipal carporation
Jalgaon Crime : मुख्यमंत्री दौर्यात पोलिस थकले अन्‌ चोरट्यांनी मारली बाजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.