Jalgaon News : 12 बाजार समित्यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

Agricultural Produce Market Committee
Agricultural Produce Market Committeeesakal
Updated on

जळगाव : कोरोनासह अन्य कारणामुळे स्थगित झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाबत नागपूर खंडपीठाने निर्णय दिल्याने निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुका महिनाभरात जाहीर होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने आणि कोरोना काळात निवडणुका न झाल्याने या बाजार समितीवर प्रशासक नेमले होते. नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली. (Elections has been cleared by Nagpur Bench decision regarding the Agricultural Produce Market Committees Jalgaon News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Agricultural Produce Market Committee
Nashik News: ग्राहक न्याय आयोगाचा महावितरणला दणका! शेतकऱ्यास 6 लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

३० एप्रिलपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आहेत. अंतिम मतदारयाद्यांचे काम आधीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे महिनभरात या बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या बाजार समित्यांमध्ये जळगाव, भुसावळ, यावल, जामनेर, चोपडा, पारोळा, बोदवड, धरणगाव, चाळीसगाव, अमळनेर, रावेर, पाचोरा यांचा समावेश आहे. यासाठी निवडणूक होणार आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणसंग्राम पाहण्यास मिळणार आहे.

Agricultural Produce Market Committee
Crime News : खोट्या अनुभवपत्रामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()