जळगाव : स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव शहराचा घसरलेला क्रमांक उंचावीत रस्ते चकाचक करण्यासाठी इलेक्ट्रीक झाडू घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात इलेक्ट्रीक झाडू शहरातील मुख्य रस्त्यावर फिरणार आहे.
तर घनकचरा प्रकल्प होईपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तात्पुरती एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. (Electric broom for road cleaning soon jalgaon news)
इलेक्ट्रीक झाडू आणि खासगी ठेकेदाराच्या नियुक्तीनंतर शहरात रस्त्यावर धुळ कमी होण्याची आशा आहे. महापालिकेने शहरातील अस्वच्छता वाढीची कारणेही शोधली आहेत. धुळ,तसेच कचऱ्यावर प्रक्रिया न होणे आणि जुने सार्वजनिक शौचालय नष्ट न करणे ही महत्त्वाची तीन कारणे असल्याचे निदर्शनास आल्या आहेत.
महापालिकेने आता त्या दृष्टीने उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कचरा मुक्त अभियानात जळगाव शहराचा क्रमांक ८४ हून तो थेट १६७ पर्यत घसरला आहे. शहराला वरच्या क्रमांकात आणण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाने सुरु केले आहे.
१५ दिवसांत झाडू
शहरात रस्ते चांगले नाहीत, अनेक रस्त्याचे कामे सुरू आहे. रस्ते चांगले झाल्यावर धुळ कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक झाडूने स्वच्छतेचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचा पहिला झाडू पंधरा दिवसात दाखल होईल.
सद्या रेल्वे स्टेशन ते महाबळ कॉलनी या मुख्य रस्त्यावर झाडूने साफसफाई करण्यात येणार आहे. भविष्यात आणखी ३ झाडू आणण्याचा प्रस्ताव आहे. शहरात रोजच्या कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रस्ताव आहे. रोजचा कचरा डंपीग न करतात त्याची रोज विल्हेवाट लावण्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे.
शैचालयांवर हातोडा
शहरात महापालिकेच्या जुन्या जीर्ण शौचालये पाडण्याचा ठराव झाला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी करुन जुनी शौचालये पाडण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. उघड्या गटारीमुळे वाढणारी अस्वच्छता कमी करण्यासाठी भुयारी गटारी योजनेचा एक टप्पा पूर्ण झाला आहे.
शिवाजी नगरात उभारलेल्या प्रकल्पाची वीज जोडणीही लवकरच होणार आहे. पहिल्या टप्प्यातील भुयारी गटारी योजना ताबडतोब कार्यान्वित करुन दुर्गंधी कमी करण्याचे नियोजन सुरु आहे.
"जळगाव शहरात काही प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे शहरात स्वच्छतेच्या समस्या होत्या,त्यामुळे शहराच स्वच्छतेचे रेटिंग घसरले आहे. परंतु आता शहरात सुविधा होत असून महापालिकाही काही प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करून घेत असल्याचे येत्या वर्षात निश्चीत स्वच्छतेत जळगावचा क्रमांक वरचा असेल." उदय पाटील,आरोग्याधिकारी,महापालिका,जळगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.