Jalgaon News : वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिल्याने शहरासह जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. यात विद्युत लाईनमध्ये देखील बिघाड झाले आहेत.
जळगाव शहरात जवळपास ३५ ठिकाणी विद्युत तारा तुटणे व विद्युत पोल वाकून वीज पुरवठा खंडीत झाल्याचे प्रकार घडले. तसेच ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडीत झाल्याचा प्रकार झाला. (Electric wires broken at 35 places in city Fault in 33 KV line Repairs on war footing Mahavitaran Jalgaon Rain Damage News )
रविवारी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात अनेक भागातील घरांवरची पत्रे उडाली होती. जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. यामुळे विद्युत तारा तुटून पडल्या होत्या.
वादळी वारा सुरू झाल्यानंतर शहरातील विद्युत पुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. दरम्यान तारा तुटल्याचे प्रकार शहरातील जवळपास ३० ते ३५ भागांमध्ये झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
३३ केव्हीच्या लाईनमध्येच झाला बिघाड
शहरातील ११ सबस्टेशनमध्ये विद्युत पुरवठा करत असलेल्या एमआयडीसी परिसरातून आलेल्या ३३ केव्हीच्या मुख्य लाईनमध्येच बिघाड झाला होता. यामुळे संपुर्ण शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.
वादळी वारा बंद झाल्यानंतर महावितरणच्या टीमने प्रथम ३३ केव्हीच्या लाईन सुरू करून सबस्टेशनचा वीज पुरवठा सुरळीत केला. यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील दुरूस्ती कामाला सुरवात केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तारांवर पडले झाडे
वादळी वारा असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये झाडे पडल्याच्या घटना घडल्या. झाडे पडल्याने विद्युत तारा तुटल्या, तसेच काही भागात विद्युत पोल देखील वाकले आहेत.
यात प्रामुख्याने रिंगरोड परिसर, शिवकॉलनी, मु.जे. महाविद्यालय परिसर, श्रद्धा कॉलनी, मोहननगर, रामदास कॉलनी, गणेश कॉलनी या भागात झाडांच्या फांद्या तुटून तारा तुटल्याचे प्रकार झाले आहेत. यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा उशिरापर्यंत खंडीत होता.
महावितरणच्या टीम रस्त्यावर
वादळी वाऱ्यामध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या तक्रारी आल्या. परंतु, वादळी वारा बंद झाल्यानंतर महावितरणच्या ७ ते ८ टीम दुरूस्तीच्या कामासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. किरकोळ दुरूस्तीची कामे तत्काळ करून तेथील वीज पुरवठा सुरू केला होता. मात्र विद्युत पोल वाकलेले, तारा तुटल्याच्या ठिकाणी दुरूस्तीचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
जिल्ह्यातही पाच विभागात वीज बंद
महावितरणच्या जिल्ह्यातील पाच विभागांत वीज पुरवठा खंडीत झालेला होता. यात चाळीसगाव, जळगाव, सावदा, पाचोरा, भुसावळ, जामनेर या विभागांचा समावेश आहे.
"वादळी वारा असल्याने मुख्य लाईन बंद झाली होती. तिची सर्वात प्रथम दुरूस्ती करून शहरातील वेगवेगळ्या भागातील दुरूस्तीचे काम टीमद्वारे तत्काळ सुरू करण्यात आले."
-व्ही. बी. पाटील, कार्यकारी अभियंता, जळगाव शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.