जळगाव : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी जळगाव परिमंडलात सुरू आहे. यात वीजबिलातील सवलतीचा लाभ घेत खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांत ३८ हजार १७२ शेतकऱ्यांनी ३७.३३ कोटी भरून योजनेस प्रतिसाद दिला आहे, तसेच या धोरणांतर्गत कृषिपंपांच्या ९९३ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून तीस मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना जवळच्या रोहित्रावर पुरेशी क्षमता असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासोबतच ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरू आहे, त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांवर क्षमता उपलब्ध नाही, त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या जळगाव जिल्ह्यात ५३१, धुळे जिल्ह्यात २४२ आणि नंदुरबार जिल्ह्यात १६७, अशा एकूण ९४० जोडण्या जळगाव परिमंडलात देण्यात आल्या आहेत.
धुळे जिल्हा टॉपवर
ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात १४ हजार ५९१ शेतकऱ्यांनी १८ कोटी आठ लाख, धुळे जिल्ह्यात १५ हजार ७२१ ग्राहकांनी नऊ कोटी ४२ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार ८६० ग्राहकांनी नऊ कोटी ८३ लाख रुपये असे जळगाव परिमंडलातील एकूण ३८ हजार १७२ शेतकऱ्यांनी कृषिपंप वीजबिलापोटी ३७ कोटी ३३ लाख रुपये भरणा केला.
वीजजोडणी व सवलतीसाठी
महावितरणने कृषिपंप नवीन वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलत, तसेच इतर मुद्द्यांच्या माहितीसाठी https://www.mahadiscom.in/solar/AG_Policy/index.php या स्वतंत्र वेब पोर्टलची निर्मिती केली आहे, तसेच ज्या कृषिपंपधारकांना नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटवर या वेब पोर्टलची लिंक देण्यात आली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.