Jalgaon : अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी वाढदिवशी गाण्यावर धरला ठेका

police officers dancing
police officers dancingesakal
Updated on

चाळीसगाव (जि. जळगाव) : येथील शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी कीर्तनकार सोहळ्यात एंट्री करत नारदाच्या गादीचा अवमान केल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती. ही घटना ताजी असताना आपल्यासह सहकाऱ्याचा वाढदिवस त्यांनी १ जूनला पोलिस ठाण्यात गाण्याच्या तालावर साजरा केला. यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. (Employees along with officers danced together on occasion birthday Jalgaon News)

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्यासह सहकाऱ्यांचा वाढदिवस १ जूनला पोलिस ठाण्यात नृत्य करत साजरा करण्यात आला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान गत महिन्याभरापूर्वी पाटील यांनी शहरात सुरू असलेल्या कीर्तन सोहळ्यात एंट्री करत ते बंद पाडले. परंतु त्याचवेळी नारदाच्या गादीवर बुटासह पाय ठेवल्याने गादीचा अवमान केल्याप्रकरणी कीर्तनकारांमधून संतापाची लाट उसळली होती.

police officers dancing
पाचोरा, भडगाव तालुक्यात होणार 54 बंधारे; 28 कोटींचा निधी मंजूर

त्यानंतर ते पुन्हा आपल्यासह सहकाऱ्यांचा वाढदिवस साजरा करतानाच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चिले जात आहे. वाढदिवस साजरा करणे यात कुठलेही गैर नाही. परंतु ते कुठे आणि केव्हा आपण साजरा करतो. याला फार महत्त्व आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या चर्चा या निरर्थक असून, दैनंदिन कामातून आलेला तणाव कमी करण्यासाठी हा वाढदिवस साजरा करण्यात येतो. यातून नवीन काम करण्याची उर्जा मिळते, असे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी सांगितले आहे.

police officers dancing
Jalgaon : अल्पवयीन मुलाचे अपहरण

"कर्तव्याच्या ठिकाणी सहकारी कर्मचाऱ्यांचे वाढदिवस साजरा केल्याने दररोजच्या कामातील ताणतणाव कमी होतो. दरम्यान, प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करा, अशा वरिष्ठांच्या देखील सूचना आहेत. यामुळे माझ्यासह सहकारी कर्मचाऱ्यांनी पाच ते सहा मिनिटे नृत्य केले. या वेळी कुठल्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झालेले नाही."

- के. के. पाटील, पोलिस निरीक्षक, चाळीसगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.