Home Buying Selling : आता सुट्यांच्या दिवशीही घर खरेदी-विक्रीची नोंदणी

Home purchase
Home purchaseesakal
Updated on

Jalgaon News : नोकरदारांना घर खरेदी-विक्रीची नोंदणी सुटीच्या दिवशीही करता येणार आहे. शासनाने त्यासंबंधी घोषणा केली असून, आठवडाभरात त्याचा अध्यादेश जारी होऊन अंमलबजावणी सुरू होईल. (Employees can now register house purchase and sale even on holidays jalgaon news)

घर खरेदी-विक्रीसाठी मुद्रांक शुल्क विभागात (रजिस्ट्रार कार्यालय) मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरून नोंदणी केली जाते. सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळेत नोंदणीची सुविधा असते. संगणकीकृत प्रणालीमुळे आता ही नोंदणीही डिजिटल झाली आहे.

मात्र, ऑनलाइन नोंदणीसाठी अनेकदा नेटवर्कच्या समस्येमुळे सर्वर डाऊन असणे व अन्य तांत्रिक अडचणी येऊन या प्रक्रियेसाठी खूप वेळ लागतो. या प्रक्रियेत बऱ्याचदा दिवस वाया जातो. त्यामुळे नोकरदारांना नोंदणीसाठी अडचण येत असते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Home purchase
Amrut Yojana : अमृत टप्पा दोनच्या प्रकल्पासाठी 3 जागांचे भूसंपादन; आयुक्त डॉ. गायकवाड

सुटीच्या दिवशी नोंदणी

त्यावर उपाय म्हणून आता शासनाने सुट्यांच्या दिवशीही नोंदणी सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. येत्या आठवडाभरात त्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात येईल आणि पुढील आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. या निर्णयामुळे सुटीच्या दिवशीही रजिस्ट्रार कार्यालय सुरू राहणार आहे. त्यामुळे नोकरदारांना नोंदणी करता येणार आहे. शिवाय अन्य कामाच्या दिवशी येणारा भारही कमी होऊ शकेल.

"सुट्यांच्या दिवशी नोंदणी सुरू ठेवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र, त्याबाबत अध्यादेश अद्याप निघालेला नाही. पुढील आठवड्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे." -सुनील पाटील, मुद्रांक अधिकारी, जळगाव

Home purchase
Jalgaon News : पाझंरापोळ रस्त्यावरील 2 मजली अतिक्रमणावर हातोडा; शहरात मोठी धडक कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.