Jalgaon News : शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला याकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. (Encroachment from Chitra Chowk to Court Chowk was removed by municipal corporation jalgaon news)
मात्र, आता या विभागाने शहरातील अतिक्रमण हटविण्याकडे लक्ष दिले आहे. पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता. १२) चित्रा चौक ते न्यायालय चौकापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले, तसेच औद्यौगिक वसाहतीतही कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे देण्यात आली.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी अतिरिक्त २० कर्मचारी घेतले आहेत. त्यानुसार विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. अजिंठा रस्त्यावर असलेल्या माठ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
त्या ठिकाणचे माठ जप्त करण्यात आले, तर औद्योगिक वसाहतीतील काशिनाथ हॉटेल चौकात एम्पिरियर हॉटेलसमोर असलेली एक टपरी हटविण्यात आली. या ठिकाणी काही रिकामटकडे लोक बसत असल्याची तक्रार होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शहरातील अतिक्रमण हटविले
शहरातील चित्रा चौक ते न्यायालय चौकादरम्यान असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. या रस्त्यावरील विक्रेत्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागातर्फे देण्यात आली.
दोन ठिकाणी टीम नियुक्त
महापालिकेतर्फे आता ख्वाजमियॉं चौक व महामार्गावरील अतिक्रमण रोखण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागातर्फे देण्यात आली. पाच- पाच कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली आहे. त्या ठिकाणी होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी हे कर्मचारी कायम त्या ठिकाणी तैनात असतील, असे अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे सांगण्यात आले.
"शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू झाली आहे. प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढून घ्यावीत, अन्यथा कारवाईत ती जप्त करण्यात येतील." -उमाकांत नष्टे, निरीक्षक, अतिक्रमण निर्मूलन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.