Jalgaon : खासगी संकुलाच्या तळमजल्याची अतिक्रमण कारवाई थांबविण्याचा ‘खेळ’

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

जळगाव : शहरातील खासगी व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर पार्किंगची जागा दाखवून त्या ठिकाणी दुकाने काढण्यात आली आहे, त्यामुळे त्या संकुलाच्या बाहेर रस्त्यावरच पार्किंग करण्यात येते आणि वाहतूकीस अडथळा होतो. नेहरू चौक ते घाणेकर चौकापर्यंतच्या २५ इमारतीच्या संकुलाच्या तळमजल्यावर ‘हातोडा’चालविण्याचे लेखी आदेश नगररचना विभागाने तयार केले, मात्र पदाधिकाऱ्यांनी तोंडी आदेश देवून ही कारवाई थांबविल्याच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नगररचना विभागातील नवीन आलेले अधिकारीही याबाबत संभ्रमात आहेत. आपल्या कार्यकाळात ‘शिक्का’ नको म्हणून आता ही ‘फाइल’ आयुक्ताकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता मनपा आयुक्त त्यावर काय निर्णय घेणार हेच पाहावे लागणार आहे.

व्यापारी संकुलाला परवानगी देताना महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे तळमजल्यावर पार्किंग सुविधा नकाशात दाखविल्यानंतरच बांधकामास परवानगी दिली जाते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे, किंवा नाही याची पाहणी करून त्या संकुलाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नगररचना विभागातर्फे देण्यात येता. (Encroachment of ground floor of private complex Verbal orders of office bearer officials of town planning department also confused Jalgaon News)

Jalgaon Municipal Corporation
Gulabrao Patil : एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता,तर राष्ट्रवादीच भाजपसोबत सत्तेत दिसली असती

संकुल बांधताना इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगची जागा दाखविली जाते. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतानाही त्याठिकाणी पार्किंगची जागा दाखविली जाते. मात्र त्या जागेवर दुकाने बांधून त्याचा व्यावसायिक वापर करण्यात येतो. यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. अनेक वेळा पोलिस या वाहनांवर कारवाई करतात बिचाऱ्या वाहनधारकांना विनाकारण शहर वाहतूक विभागाच्या कारवाईचा भुर्दंड पडतो.

खासगी संकुलाबाबत हीच बाब लक्षात घेऊन महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नगररचना विभागास आदेश देवून अशा इमारतीचे सर्वेक्षण करावे असे लेखी कळविले.

महापालिकेतर्फे सर्वेक्षण आणि अहवाल

महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील वाहतुकीचा रस्ता असलेल्या नेहरू चौक ते घाणेकर चौक रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी व्यापारी संकुलाचे सर्वेक्षण करून तब्बल २९ इमारतींना पार्किंग नसल्याच्या नोटीस बजावली. त्यांची महापालिकेत कागदपत्रांसह सुनावणी घेण्यात आली. त्यात केवळ दोन संकुल धारकांना कागदपत्रे सादर केली उर्वरित २५संकुलाच्या इमारतीत अनधिकृतपणे तळमजल्यावर दुकाने असल्याचे दिसून आले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच इमारतीच्या तळमजल्यावरील दुकांनावर कारवाई कारवाई करण्याचे ‘स-कारण’आदेश तयार केले आणि ते अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठविण्याची तयारी केली.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon : सोने 600 तर चांदी 1500 एकाच दिवसात वधारली; डिसेंबरअखेर सोन्याचा दर 60 हजारांवर

वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कारवाई थांबविली

संकुलाच्या तळमजल्यावरील दुकानावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच महापालिकेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने कारवाई न करण्याचे तोंडी आदेश दिले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांकडे लेखी आदेश देण्याची मागणी केली, मात्र अतिक्रमण कारवाईत अडवण्याच्या भीतीने त्यांनी केवळ ‘तोंडी’ आदेशावरच ही कारवाई थांबविण्यात आली. संबंधित पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई का थांबविली? असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

नगररचना अधिकारी संभ्रमात

खासगी इमारतीच्या व्यापारी संकुलातील तळमजल्यावरील दुकानाच्या अतिक्रमणाबाबत एका पदाधिकाऱ्यांनी कारवाईचे लेखी आदेश दिले, मात्र दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी कारवाई थांबविण्याचे तोंडी आदेश दिले. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागात नव्याने दाखल झालेले अधिकारीही यामुळे संभ्रमात पडले आहेत.आपल्या कार्यकाळात ‘शिक्का’ नको म्हणून आता त्यांनी आता ही कागदपत्रे आयुक्ताकडे कारवाईस पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे आता आयुक्त यावर काय निर्णय घेणार याकडेच लक्ष आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती; गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.