यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील यावल अभयारण्यातील (Yaval Sanctuary) जामन्या वन क्षेत्रातील लंगडा आंबा परिमंडळ आणि करंजपाणीमधील अनधिकृत ७७ झोपड्या (Unauthorized huts) हटवण्यात आल्या असून वनजमीन ताब्यात घेण्यात आली आहे. (Encroachment on Yaval Sanctuary removed Jalgaon news)
येथील अभयारण्य सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकार अमोल चव्हाण (पाल) यांच्या नेतृत्वात यावल अभयारण्यातील जामन्या वन क्षेत्रातील लंगडा आंबा परिमंडळ आणि करंजपाणीमधील अनधिकृत ७७ झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. या कारवाईतून १६६ अनधिकृत अधिक्रमणधारकांचे २६४.३६ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण निष्कासन करून नियमानुसार वनजमीन ताब्यात घेण्यात आली आहे.
या कारवाईप्रसंगी पोलिस, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, यावल पोलिस निरीक्षक आशित कांबळे यांनी मनुष्यबळ आणि संरक्षण उपलब्ध करून दिले, या कारवाईच्या वेळी यावल अभयारण्य, यावल वनविभागमधील वनपाल, वनरक्षक तसेच राज्य राखीव दलाचे जवान उपस्थित होते. या वनक्षेत्रात खोल, सलग समतोल चर घेऊन पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याची माहिती यावल सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.