Jalgaon News : फैजपूर तलाठी कार्यालय अंतर्गत फैजपूर शिवारातील शासकीय कर थकबाकीदार शेती आणि बिनशेती (एन ए प्लॉट) खातेदारांकडील शासकीय कर वसुलीची मोहीम सुरु आहे.
यात शासकीय कर थकबाकी न भरणाऱ्या ५० खातेदारांच्या मालमत्तेवर बोजा बसवण्यात आला.(Encumbrances on account holders properties from Faizpur Talathi office jalgaon news)
फैजपूर तलाठी कार्यालय अंतर्गत फैजपूर शिवारात साडे सहा हजार शेती आणि बिनशेती (एन ए प्लॉट) खातेदार आहेत. दरवर्षीचा १२ लाखाचा कर भरणा असून ६ हजार ३८२ खातेदारांना कर भरण्यासाठी तलाठी कार्यालयातर्फे नोटिसा देण्यात आल्या. खातेदारांकडे एकूण ४७ लाख ६० हजार रुपये कर थकबाकी आहे. बहुतेक खातेदारांकडे पाच ते सहा वर्षांपासून थकबाकी आहे. तर काहींकडे चालू वर्षाची बाकी आहे.दरम्यान वर्षे दोन वर्षे झाली.
फैजपूर तलाठी कार्यालयाचे कर्मचारी कर वसुली साठी जाऊनही थकबाकीदार खातेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शंभर टक्के शासकीय कर वसुलीचे यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या सूचनेनुसार महिनाभरापासून तलाठी तेजस पाटील व येथील तलाठी कार्यालयाचे कर्मचारी शेती आणि बिनशेती (एन ए प्लॉट) खातेदारांना नोटिसा देऊन वसुली सुरु आहे.
थकबाकी शासकीय कर रक्कम भरण्याविषयी वेळोवेळी खातेदारांकडे जात आहे.सर्व फैजपूर शिवारातील शेती आणि बिनशेती (एन ए प्लॉट)खातेदारांना त्यांच्या कडील असलेली शासकीय कर वसुली रक्कम तत्काळ तलाठी कार्यालय फैजपूर येथे जमा करावी.
अन्यथा जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १७६ प्रमाणे योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देत फैजपूर तलाठी कार्यालयातर्फे पहिल्या टप्प्यात एक हजार मालमत्ता खातेदारांकडून १३ लाख रुपये शासकीय कर वसुली करण्यात आली. ५ हजार ३८२ खातेदारांना कडून कर वसुली करणे मोहीम सुरु आहे.
पूर्वी तलाठी कार्यालयामार्फत घरोघरी फिरून कर वसूल होत. मात्र पद्धत १ ऑगस्ट २०२३ पासून बंद करण्यात आलेली ही पध्दत ऑनलाइन असल्यामुळे तलाठी कार्यालयातच येऊन भरावा लागेल. पहिल्या टप्प्यातील नोटीस देऊन सुद्धा कर न भरणा करणाऱ्या ५० मालमत्ता खातेदारांच्या मालमत्तेवर बोजा बसवण्यात आला आहे.
''फैजपूर शिवारातील शेती आणि बिनशेती (एन ए प्लॉट) खातेदारांना पहिल्या टप्प्यातील नोटीस देऊन सुद्धा कर न भरणा करणाऱ्या ५० लोकांच्या मालमत्तेवर बोजा बसवण्यात आलेला आहे.ही कार्यवाही निरंतर सुरू राहील कटू प्रसंग टाळण्यासाठी शेती व बिनशेती कर भरणा वेळेत भरून सहकार्य करावे.''-तेजस पाटील,तलाठी फैजपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.