एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात नक्की कोण बाजी मारेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याने उमेदवारांच्या संख्येमुळे मोठी वाढ झाली आहे. अशातच सगळेच उमेदवार प्रचार मोठ्या दिमाखात करत असल्याचे पाहायला मिळत आहे
महायुती तर्फे गेल्या पाच वर्षात कशाप्रकारे मतदारसंघाचा विकास झाला कशाप्रकारे शहरांमध्ये विविध फुलांचे बांधकाम झाली या प्रकारचा प्रचार केला जात आहे. तर बंद पडलेला वसंत सहकारी कारखाना गावांचे न झालेले पुनर्वसन पद्मालय प्रकल्प एमआयडीसी व मूलभूत सुविधांचा अभाव याचा प्रचार विरोधक करत आहेत.