Jalgaon Bribe Crime: बहिस्थ परीक्षकाचाच परीक्षेत गैरप्रकार; YCMOUचा बहिस्थ परीक्षक ACBच्या जाळ्यात

Vijay Patil
Vijay Patilesakal
Updated on

Jalgaon Bribe Crime : अमळनेर येथील एका महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील बहिस्थ परीक्षकालाच लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. (Exam Malpractice by External Examiner of YCMOU in arrested by ACB Jalgaon Bribe Crime)

अमळनेर येथील एका महाविद्यालयाच्या केंद्रावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. यात विद्यापीठाने विजय गुलाबराव पाटील यांची बहिस्थ परीक्षक म्हणून नेमणूक केलेली होती.

परीक्षा काळात परीक्षार्थींना विनाकारण त्रास देणे, कॉपी चालू देण्यासाठी त्यांच्याकडून पैशांची मागणी करणे, असे प्रकार चालू असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले होते. यातच तक्रारदाराच्या पत्नीचे व इतर ८ विद्यार्थ्यांचे बॅचलर ऑफ लायब्ररी (बी.लिब) चे पेपर सुरू होते.

विजय पाटील यांनी परीक्षक म्हणून पेपर सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच कॉपीला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक विषयासाठी १०० असे ९ विषयांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ९०० रुपयांची अशी एकूण ७२०० रुपयांची मागणी त्यांनी विद्यार्थ्यांकडे केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vijay Patil
Mumbai Crime: दारूमुळे झाला कर्जबाजारी, मग कर्ज फेडण्यासाठी थेट डॉमिनोजमध्ये चोरी

दरम्यान, शुक्रवारी (ता.२) पेपर सुरू झाल्यावर तक्रारदार विजय पाटील हे तडजोड अंती ठरलेल्या रकमेपैकी पाच हजार रुपये महाविद्यालयाच्या आवारातच स्वीकारत असताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पथकातील राजेंद्र गीते, संदीप बत्तीसे, संजय ठाकरे, संतोष गांगुर्डे यांनी विजय पाटील यांना रंगेहाथ पकडले.

अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

परीक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

परीक्षेत कॉपी तसेच इतर सहकार्य करण्यासाठी परीक्षकच जर लाचेची मागणी करत असेल तर याचा विपरीत परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होणार असल्याचे शिक्षणप्रेमींनी सांगितले. परीक्षेमध्ये विद्यार्थी गैरप्रकार करतात, हे आजपर्यंत वाटत होते.

मात्र आता परीक्षकच असे करत असतील तर मात्र हे भयंकर आहे. विद्यापीठ अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी काय उपाययोजना करत ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Vijay Patil
Jalgaon Crime News : सापडलेल्या किसान कार्डवरून 51 हजार लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.